
प्रजासत्ताक
प्रजासत्ताक भारताचे
सुजाण नागरिक आम्ही
कर्तव्य देश रक्षणाचे
जणितो हमखास आम्ही
न्याय, समता, बंधुभाव
गुण ग्राही देश आमुचा
शत्रूला उत्तर देण्यात
नसे कदापि लेचापेचा
संविधान मार्गदर्शिका
तत्वप्रणाली ही महान
अनुपालन करण्याचे
ठेवितो आम्ही नित्य भान
भारतीय प्रजासत्ताक
दिन सोहळा आज झाला
ध्वज तिरंगा महान हा
गणराज्य दिनी हर्षला
दत्ता काजळे(ज्ञानाग्रज)
उस्मानाबाद