
मनपाखरू
भिरभिर भिरारते
नीलनभी उंडारते
कसे हे मनपाखरू
अवकाशी विहारते
सागराचा तळ गाठे
तळातील मोती वाचे
कंठे मोत्यांचे सुरेख
लेवूनिया गळी नाचे
जाई बागेत विहारे
सुगंधीत फुलांवर
सारा पसारा विश्वाचा
बांधुनिया डोईवर
मोरपीस गोंजारते
पंख लेवून मोराचे
मन पाखरू उडते
उरलेल्या आठवांचे
आठवांचे मुरलेले
मूरे मुरता लोणचे
जगण्याचे अवास्तव
भान उरता कशाचे
सविता धमगाये नागपूर
=====