
पुस्तक
एक एक पुस्तक असे, ज्ञानाची खान
“त्यांच्यामुळेच मिळतो जीवनात मान
असा अनमोल ठेवा, करू जतन
त्यांच्यामुळेच जगात मिळतो मान सन्मान.
महापुरुषांच्या आदर्शाचा पुस्तक मार्गदाता
जीवनातील चढउतारांवर करी सोबत सदा,
कधी न भासे एकलकोंडा सदा सोबत
वाचन करी सदा न कदा पुस्तक
पुस्तक होई मित्र , दु:खी मनास आधार
तोच सांगाती आमचा नाही कोणी निराधार
मरगळलेल्या जिवा देई नवचैतन्य
फुलवी जीवनात सदा गुलमोहर
देश विदेशांतील शोध तंत्रज्ञानाचे ज्ञान
अमूल्य ठेवा ठेवून जतन वाचनाने
वाढवू ज्ञान वाचून सांगू जगाला
वाचा व देश वाचवा ध्यानी ठेवा.
मायादेवी गायकवाड
======