
रामेती नगरी
रामेती नगरी ही सुंदर
भावली मनास फार
आम्ही भाग्यवान थोर
प्रशिक्षणार्थी दमदार !
अनुभवी हे मार्गदर्शक
लाभले श्री झगडे सर
शिस्त ही लावली जरुर
योग्य असेच हे विचार !
पावन नगरी रे आळंदी
संत ज्ञानेश्वर सर्वापार
नतमस्तक आयुष्यभर
मना शांती मिळे निरंतर!
मार्गदर्शन केले हे सुंदर
प्रा.विनायक देशमुख सर
सूत्र संचालन हे दर्जेदार
श्री अजिंक्य दुधाने सर
अध्यक्ष लाभले असे थोर
मा. श्री. नाईकवाडी सर
वि.कृ.स.सं पुणे पदभार
कर्तव्यदक्ष हे अधिकार !
सल्ला दिला हा सुंदर
खेळा खूप असे भरपूर
आरोग्य उत्तम दमदार
घ्या प्रशिक्षण हे दर्जेदार!
भिविष्यात उपयोगी फार
मिळेल कष्टाची रे भाकर
पडेल ज्ञानात नवीन भर
योग्यता करा सिद्ध जरुर
ऑफिस सहकारीहे सुंदर
प्रत्येक सहकार्य वेळेवर
ढोबळे & पाटील मॅडम
मदत करतात रे भरपूर!
आत्मविश्वास हा दमदार
मिळाला ज्ञानाचा सागर
अनुभव पाठीशी खंबीर
सारे कर्तव्याचे शिलेदार
अशोक महादेव मोहिते
कवी,सैनिक,लेखक
बार्शी,जिल्हा सोलापूर