
युवा भीम सेनेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने वसुधा नाईक सन्मानित
पुणे: युवा भीम सेना सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य पाचवा वर्धापन दिन सोहळा नुकताच साजरा झाला. या वर्षीचा आदर्श शिक्षिका पुरस्कार सौ वसुधा नाईक यांना प्रदान करण्यात आला. या वेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दणाने, महिला अध्यक्ष फहमिदी इमानदार, जिल्हा सचिव मुमताज शेख, उपअध्यक्ष सौरभ कांबळे ,कामगार आघाडी अध्यक्षआनंद टपाले,हवेली ता.अध्यक्ष कामगार आघाडिचे राॅबर्ट ॲंथोनी,पुणे जि.सदस्य रियाज शेख आदी कार्यकर्ते हजर होते.
या सर्वांचे विशेष कौतुक, कारण मी या पुरस्काराला २२/०१/२०२३ रोजी उपस्थित राहू शकले नाही. या कार्यकर्त्यांनी माझा सन्मान घरी येवून पुरस्कार दिला.सर्वांचेच मी आभार मानते असे वसुधा नाईक यांनी सांगितले.