
‘बघ ना… माझे अश्रूही कोरडे झालेत’; सविता पाटील ठाकरे
_बुधवारीय काव्यरत्न परीक्षण_
🙏माझा बाळ…. कसा गेलास रे मला तू सोडूनी…! अरे या म्हातारपणाचा माझा एकमेव आधार होतास तू…! कसे जगू मी आता तुझ्याविना????तुला माहिती नसेल ही कदाचित तू पोटात असतानाच तुझे बाबा कायमचे सोडून गेले मला…..केवळ तुझ्यासाठी. होय तुझ्यासाठीच मी उभी राहिली, खूप संघर्ष केला. असा संघर्ष, की मला जन्म देणाऱ्या त्या धरणी मातेलाही जन्म देण्याचा पश्चाताप होत असेल.
🙏मी उभी राहिली केवळ तुझ्या साठी…. आणि आज जेव्हा मला तुझ्या खांद्यावर बसून निरोप घ्यायची वेळ आली त्याचवेळीस तू मला असं निराधार टाकून कसा रे निघून गेलास??? तुझ्याविना… नाही …नाहीच मी नाही जगू शकत. या दुःखाच्या खोल गर्तेत मला एकटीला सोडून गेलास तू कायमचा गेलास..तुझ्या वियोगाच्या दुःखाने माझे अश्रूही कोरडे झालेत.
आईची ही वेदना मांडताना नकळत माझे डोळ्यात कधी अश्रूंचा पुर आला मला देखील कळलं नाही. ‘तुझ्याविना’अर्थातच आपल्या आयुष्यातलं काहीतरी खूप मोठे गमावून त्या विरहाच्या वाटेने जगणं, कुढत राहणं, मरण सारं काही होय.
📕तुझ्याविना जगताना प्रियसीन प्रियकराची अर्धवट सोडलेली साथ असेल किंवा विरहाची खोल व्याप्ती असेल, सततची ओढ असेल किंवा तो पुन्हा भेटण्याचा आशावादी दृष्टिकोन असेल. काल परवाच माझ्या वाचनात आले….सीमेवर देशसेवेसाठी निघालेल्या सैनिक पत्नीच्या मनोबलाची गाथा किती दुर्दम्य विश्वास आहे तिचा नवऱ्याच्या कर्तुत्वावर आणि सामर्थ्यावर.. ती म्हणते की तुझ्याविना मी जगेल काही दिवस कारण माझ्यापेक्षा या भारत मातेला तुझी जास्त गरज आहे.
💙’तुझ्याविना’ या विषयाची तार छेडताना बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा राहुल सरांनी खूप काही अपेक्षा ठेवल्याच असतील.विषयाला केवळ एकाच अंगाने न पाहता त्याच्यातील मर्माला साद घालण्याचा त्यांचा मानस यशस्वी तेव्हाच होईल जेव्हा आपण लिहिताना सर्वकष विचार करू. परीक्षणाच्या निमित्ताने रचना वाचतांना मला जाणवले की पुष्कळजणांनी विविध अंगी विचार केलेला आहे. यातूनच प्रचिती येते ती सामर्थ्यवान लेखणीची.
✍️कुणी आईची उणीव तर कुणी प्रियसीची माया.. कुणी आठवणींचा सुसाट वारा तर कुणी पतीचा विरह कुणी मित्राची आठवण तर कुणी प्रेमातील गंमत जंमत…सारे काही तुझ्याविना या शब्दात बांधण्याचा सुंदर व अनोखा प्रयत्न केलेला आहे. सर्वांचे खूप खूप कौतुक व पुढील लिखाणासाठी अभिनंदनिय शुभेच्छा.
सौ. सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री/समीक्षक/मुख्य सहसंपादक