सेवासदन शिक्षण संस्थेतील माजी विद्यार्थ्यांचा माहेर मेळावा उद्या

सेवासदन शिक्षण संस्थेतील माजी विद्यार्थ्यांचा माहेर मेळावा उद्यापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: सेवासदन शिक्षण संस्थेच्या उपक्रमांमधील एक उपक्रम म्हणजेच माजी विद्यार्थ्यांचा माहेर मेळावा दिनांक 5 फेब्रुवारी 2023 रोजी सीताबर्डी स्थित संस्था परिसरात सकाळी 9 ते 5 यावेळेत आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सकाळी १० वाजता. राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका श्रीमती शांताक्का या प्रमुख अतिथी उपस्थित राहणार असून समारोपीय कार्यक्रमास दुपारी ४ वाजता. ज्येष्ठ निरूपणकार व विचारवंत विवेकजी घळसासी मेळाव्याला संबोधित करतील.

दिवसभर चालणा-या कार्यक्रमात मनोरंजनात्मक खेळ, स्वानुभव कथन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने माजी विद्यार्थिनींनी उपस्थित राहून संस्थेचा आनंद वृद्धिंगत करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्रीमती कांचन गडकरी, सचिव श्रीमती वासंती भागवत व संपूर्ण कार्यकारिणीने केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles