
वास्तव
जगातील एक अद्भूत सत्य
प्रेमात फक्त प्रेमच असते
प्रेमविरांनी दाखवून द्यावे
प्रेमाशिवाय काहीही नसते
जगण्याची उम्मीद सारी
जरी प्रेमामध्येच दिसते
प्रेमाची ही खरी वागणूक
प्रेमातूनच कळत असते
कळत नाही प्रेम ज्यांना
समजून घ्यायला हवा
नसतेय अय्याशी त्यात
जीवनसाथी असते नवा
जीवनातील साथीदार हा
असतोच अनमोल ठेवा
जिव्हाळ्याचे नाते जुळले
कशासाठी करतोय हेवा ?
स्वार्थी अन् मतलबी जे
प्रेमालाच बदनाम करते
का समजत नाही त्यांना
आत्महत्या करून मरते
वास्तव आहे जिवनाचे
सर्वांनी हे समजून घ्यावे
मरने म्हणजे प्रेम नव्हे
आयुष्यभर नातं निभवावे
चंदू डोंगरवार अर्जुनी मोर
=====