संस्काराने घडतो मानव

संस्काराने घडतो मानवपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

“सत्यम शिवम सुंदरम यांचा हृदयंगम संगम म्हणजे संस्कृती.” पण मागच्या आठवड्यापासून या संस्कृतीला हृदयाच्या एका कप्प्यात बंद ठेवून पाश्चात्य संस्कृतीने धुमाकूळ घातला आहे. जिकडे पहावं तिकडे डोळ्यांना दिसत ही तेच. कानाला ही तेच ऐकू येतं, बोलायला ही तोच विषय. जणू गांधीजींच्या तीनही माकडांनी देखील या विषयावर गांधीजींचे तत्व सोडून वागायचे ठरवलय असंच वाटतं. हे सगळे विचार मनात खळबळ माजवत असताना अचानक… ‘एफ एम’ वर संस्काराने घडतो मानव… हे गीत ऐकायला मिळाले आणि मग विचारचक्र वेगळ्याच दिशेला भिरभिरू लागले. संस्कार केवळ साडेतीन अक्षरांचा शब्द. पण प्रत्येकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा. फार मोठा व गहन शब्दाचा अर्थ.

प्रत्येक आईच्या पोटी जन्मलेल्या बालकावर सर्वप्रथम आई वडिलचं संस्कार करत असतात. संवेदनशील बालमन या वयात झालेल्या संस्कारांना आयुष्यभर सोबत घेऊन दिव्य प्रकाश पसरविण्याचे काम करतात. म्हणूनच प्रत्येक आई-वडिलांना संस्कारातल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. याकडे थोडं जरी दुर्लक्ष केलं तरी आयुष्यातील एखाद्या मोठ्या लक्ष्यापासून त्यांना वंचित रहावं लागतं म्हणून आई-वडिलांचं सुसंस्कृत असणं अगत्याचं आहे. बालपणी ज्यांच्यावर चांगले व टिकाऊ संस्कार होतात त्याच व्यक्ती पुढे योग्य मार्गाने वाटचाल करुन प्रगतीच्या शिखरावर जाऊन पोहोचतात. म्हणून आई वडिलांचे संस्कार हे पैलू पाडणारे असावेत.

खरं तर विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर स्त्रीच्या उदरात असतानाच मूल बाहेरच्या जगाचा कानोसा घेत असतं असं म्हणतात. अगदी गर्भावस्थेत संस्कारांचे महत्त्व बालकावर घडत असतात. महाभारतातील वीर पुत्र अर्जुन आणि सुभद्रा यांचा पुत्र अभिमन्यु याच्यावर आईच्या गर्भातच चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान संस्कार झालेले होते….. पण ते संस्कार अपुरे राहिले. त्यामुळे अभिमन्यु चक्रव्यूहात फसला….. या संस्कारा बद्दल सांगताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘पोटात असता जीव पडोन, जतन करावा संस्कारे’ ‘संस्कार दुष्परिणाम कारी न पडावे आतिल गर्भावरी’. तसं पाहिलं तर प्रत्येक माणसाचे दोन जन्म एक जन्म प्रकृतीचा म्हणजे आई-वडिलांपासून झालेला. आणि दुसरा संस्कृतीचा म्हणजे संस्कृतीमुळे झालेला. वेशीच्या उदरी जन्म घेऊनही वशिष्ठ तपश्चर्येने विप्र झाले. तद्वतच मानव जन्माचे सार्थक होण्यासाठी लहानपणापासून चांगल्या संस्कारांची आवश्यकता असते. संस्कारा शिवाय माणसाला खरं मनुष्य पण येत नाही.

पण हल्ली पाश्चात्य अंधानुकरण यामुळे आई-वडील यांच्यात मतभेद, घटस्फोट. या गोष्टी घडतात आणि त्यामुळे मुलांवर काय संस्कार होणार? असा प्रश्न उद्भवतो. आपल्या संस्कृतीत विवाह करार नसून एक तो एक पवित्र संस्कार. केवळ पती-पत्नीच्या प्रेमासाठी विषय सुखासाठी नसून तो मुलाबाळांवर सुसंस्कार करण्यासाठी आहे हे पाश्चात्यांनाही पटले पण आपण मात्र… माणसांमध्ये देवाने दिलेल्या संवेदना, भावना, वासना, प्रेम या सर्वांचा मेळ परमेश्वराने घालून दिला असताना सुद्धा, माणसाचं वर्तन बिघडत चालले आहे. त्यामुळे आदर्शाच लोणचं होताना दिसते. म्हणूनच संस्कार हे मानवी जीवनाचा आणि जगण्याचा अविभाज्य घटक आहे. संस्कार हे मानवतेचा महामार्ग. या मार्गाने गेला तरच…. ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’. हे बुद्धीला पटून संस्काराने घडतो मानव. यात यथार्तता आहे असचं वाटेल….!!

अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles