नव्या रंगाची, नवी उधळण…नव्या विश्वासासाठी; सविता पाटील ठाकरे

नव्या रंगाची, नवी उधळण…नव्या विश्वासासाठी; सविता पाटील ठाकरेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

रंग हे नवे…होय नवाच रंग…. गेले कित्येक दिवस मी न्याहाळत होते, किंबहुना माझ्या नजरेतून बारीक गोष्टही सुटत नव्हती..विषय होता रक्ताच्या नात्याला स्वार्थाचा चढलेला नवा साज.अगदी शुल्लक शुल्लक गोष्टीत वारंवार आडवा येणारा मीपणा ,गर्व, मग त्यात भावा भावातील विसंवाद,म्हाताऱ्या आईवडिलांना कोण सांभाळणार यावरून एकमेकांवर येणे…अरे कोण मोठा कोण छोटा???,कोण गरीब कोण श्रीमंत???? हे ठरवणारे आपण मुळात आहोतच कोण????

रंग हे नवे स्वार्थाचे,
बरबटलेल्या विकृतीचे,
निर्ढावलेल्या मनोवृत्तीचे,
नात्याच्या तिलांजलीचे..

स्वार्थासाठी सरड्यासारखे रंग बदलणारी ही मानवजात पाहिली की मला तो निसर्गच जवळचा वाटतो… तो नाही करत भेदाभेद,उधळतो मुक्तरंग अगदी सर्वीकडे म्हणूनच तर वसंतात सर्व पालवी झडते आणि रंग चढतो तेरड्याला…. ती फुलपाखरे पहा रंगीबेरंगी चादर ओढून बागडतात,उडतात या झाडावरून त्या झाडावर…. ना कुणाची भीती ना कुणाचे भय..

तसं पाहिलं तर प्रेमाचा रंगही अनोखा आहे म्हणूनच त्याच्या एका कटाक्षाने रक्तीमा चढतो तिच्या गालावर… आणि तिच्या मंद स्मित ने त्याच्या चेहऱ्यावरचे तेज जणू सूर्याशी स्पर्धा करू पाहते…!

तिन्ही सांज झाली की दूर क्षितिजावर कधीतरी सांज खुलते… तांबडा रंग असा पसरतो की जणू काही त्याने सूर्यावरच मात केली आहे.ते सौंदर्य,तो नवा रंग डोळ्यात कितीही साठवला तरी ते अपूर्णच वाटते…त्याला कधी कधी जोड देतो तो इंद्रधनुष्य चा सप्तरंगी पट्टा.सारे काही आपल्या कवेत घेत जणू आपल्याला आव्हानच देत म्हणतो कितीही करा हो तंत्रज्ञानात प्रगती पण मी मात्र इतरांपेक्षा न्याराच आहे.

स्वार्थाचा मोह मायेचा रंग तर दिसतोच सर्वत्र… पण माणुसकीच्या भिंतींना कर्तव्याचे शिंपण करणाऱ्या पोलीस भगिनी… एक-दोन दिवसाच्या अनाथ बालकाला स्वतःच दूध पाजतांना मी पाहते आणि हा अनोखा भाव अविष्कार असलेला रंग माझ्या काळजाला सरळ जाऊन भिडतो. स्री च्या अशा त्यागमय जीवनात तर रंगांचे मिश्रण एवढे गर्द असते की त्यात तिचा रंग ओळखणे दुरापास्त…

कधी ती आई होते..कधी बहीण.. कधी पत्नी..तर कधी आजी..पण प्रत्येक वेळेस नवं नाते नव्या रंगात किती छानपणे रंगवते ना ती….हे सर्व जरी खरं असलं तरी मला नेहमीच वाटते.

आज खरी गरज आहे ती…
स्नेहाच्या बांधिलकीची…
प्रेमाच्या उधाणाची…
नात्यातल्या आपुलकीची…
अन् एक नव्या विश्वासाची..

आज तमाम मराठी साहित्यिकांच्या मनात असा विश्वास,असं नातं निर्माण करणाऱ्या बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी ‘रंग हे नवे’ हा विषय देऊन सर्व सारस्वतांच्या मांदियाळीत एक नवा रंग भरण्यासाठी प्रत्येकाच्या हातात जणू कुंचलाच दिला. खूप छान व्यक्त झालेत कवी कवयित्री…

रंग हे नवे रानफुलांचे…
रंग हे नवे स्वभावाचे…
रंग हे नवे नात्यांचे
रंग हे नवे नवतीचे…
रंग हे नवे प्रेमाचे….
रंग हे नवे प्रीतीचे…
रंग हे नवे हसरे…
रंग हे नवे रुपेरी…

अशा अनेक भावभावनांचा सुरेख संगम परीक्षणार्थ रचना वाचताना आला. सर्वांचे मनापासून अभिनंदन.

✍️पण थोडे काही…!

कविता ही कादंबरी नाही ज्यात आपण विस्तारित लिहू शकतो ती एक छोटी कथाही नाही जिथे आपण मर्यादित शब्दांचा खेळ खेळू शकतो.तर कविता ही अंतकरणातून उत्स्फूर्तपणे सुचलेल्या शब्दांची मांडणी होय. अशा कवितेत शब्द महत्त्वाचे ठरतात शब्दांना स्वतः सुंदर बनवावे लागते कवितेला जीवन द्यावे लागते कविता जेव्हा आतून येते तेव्हा ती सर्वांना खूप खूप आवडते तेव्हा आपला काव्यरूपी आविष्कार नेहमीच वाचकांना नवनवीन अनुभव व अनुभूती देणारा असावा..या अपेक्षेेसह थांबते..!

सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक, प्रशासक, कवयित्री

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles