
हे भाव अंतरीचे
हे भाव अंतरीचे सजणा तुला कळावे
प्रेमात फुलावे सजनीस ना विसरावे ॥धृ॥
प्रेमाचे गीत माझ्या ओठांवरी सख्या आले
जीवनी धूंद व्हावे, मोदास उधाण यावे
सजनाने सजणीला प्रीतीत मनी स्मरावे ॥१॥
आठवात सजनाच्या मिलनाची ओढ हवी
ह्रदयांतरी मिलनाची आतुरता ही हवी
मनी मिलनाचे श्वास एकांती उमटावे ॥२॥
शब्द कुपीतले ओठांवरी तुझ्या फुलावे
गुज अंतराचे हे शब्दरूपात नहावे
पाव्यातील शब्द सूर आसमंती गुंजावे॥३॥
मिलनाच्या काव्यलहरी संथ किणकिणल्या
एकांतवासात दोघात उफाळून फुलल्या
प्रीतलहरींनो पावसाप्रती बरसावे ||४||
वसुधा नाईक,पुणे
======