‘नदी स्वच्छता संकल्पना तरूणांमध्ये रुजावी’; गजेंद्रसिंग शेखावत

‘नदी स्वच्छता संकल्पना तरूणांमध्ये रुजावी’; गजेंद्रसिंग शेखावत



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, जिल्हा प्रतिनिधी

पुणे: “कुठलेही कार्य, कोणताही विचार तळागाळापर्यंत पोहचला तरच तो यशस्वी होतो. म्हणून ‘नमामि गंगे’ अंतर्गत शहरातून वाहणा-या नद्यांची स्वच्छता स्थानिक संस्थांच्या सहयोगातून साध्य केल्यास आणि त्यामध्ये अगदी शेवटच्या व्यक्तीला सुध्दा सहभागी करून घेतल्यास हे अभियान नक्कीच यशस्वी होईल.” असे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री, गजेंद्रसिंग शेखावत यांनी ‘धारा- २०२३ परिषद’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.

‘हाॅटेल हयात, पुणे’ येथे राष्ट्रीय स्तरावरील ही परिषद, नॅशनल ईन्टस्टीट्यूट ऑफ अर्बन अफेअर, नॅशनल मिशन फाॅर क्लीन गंगा, सिटी रिव्हर्स अलायन्स आणि पुणे महापालिका यांनी संयुक्तपणे आयोजित केली होती. या संस्थांचे पदाधिकारी हितेश वैद्य, असोककुमार आणि पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रमकुमार हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमात पुढे बोलताना मंत्री महोदय शेखावतजी म्हणाले, ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे अभियान त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य दिशेने प्रगती करीत असून जगाचे लक्ष वेधून घेत आहे. एखादा दृढ संकल्प एकाच दिशेने पुढे नेताना त्यास अनेकांचे हात लागले तर कोणतेही काम कित्येक पटीने गतिमान होते. या परिषदेच्या निमित्ताने बहुसंख्येने उपस्थित प्रतिनिधीं बघता ‘नमामि गंगे’ उपक्रमात विविध शहरातून कितीतरी लोक जोडले गेले आहेत, याची प्रचिती येते. एक सुवर्णमयी आशेचा किरण या ध्येयवादी लोकांच्या कार्यातून दिसतो आहे. नद्यांचे पावित्र्य आणि स्वच्छता राखणे आणि त्यांना वाहत्या ठेवणे, हीच खरी जलशक्ती संवर्धनाची दिशा आहे. ओढे, नाले, पाण्याचा प्रत्येक प्रवाह, नद्या, सागर ही जलसाखळी कुठेही तुटली तर जलशक्तीला हानी पोहचेल. म्हणून आपण ही जलसाखळी जपण्याचा दृढ संकल्प करायला हवा. यातून पाण्याचे जमिनीखाली पुनर्भरण, नद्यांचे शुध्दीकरण, सांडपाण्याचे शुध्दीकरण ही सध्याच्या काळाची गरज असून पृथ्वीवरील उपलब्ध पाणी साठ्याची बचत करणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. नदी स्वच्छतेसह पाणी बचतीच्या या उपक्रमांसाठी हजारो कोटींचा निधी मंजूर करून विविध उपक्रमाद्वारे हे काम युध्द पातळीवर देशभर सुरू आहे.” अशी माहिती देऊन त्यांनी या संदर्भात आपल्या भाषणात पुण्याचा ‘मुळा-मूठा नदी सुधार प्रकल्प’ लवकरच पूर्ण होणार असल्याचा आवर्जून उल्लेख केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles