कवयित्री सविता धमगाये यांच्या ‘सुगंधी जखमा’चे थाटात प्रकाशन

कवयित्री सविता धमगाये यांच्या ‘सुगंधी जखमा’चे थाटात प्रकाशनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून झाले गोळा कारण नागपूर नगरीत रंगला मराठीचे शिलेदार समूहाचा
गौरवशाली सोहळा.

सविता धमगाये यांच्या सुगंधी जखमा काव्य संग्रहाचे प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष व उद्घाटक मा. प्रभाकर दहिकर, वन्यजीव मार्गदर्शक, सरंक्षक व समाजसेवक, प्रमुख मार्गदर्शक व अतिथी संपादक मा.सुधाकर भुरके, ज्येष्ठ कवी, नागपूर प्रमुख अतिथी मा. प्राजक्ता खांडेकर, सिनेतारका चित्रपट निर्माती, नागपूर, प्रदीप ढोबळे, व्याख्याते, कवी संमेलनाध्यक्ष: मा. डॉ. संजय पाचभाई, नागपूर, प्रमुख पाहुणे: मा. विजय शिर्के, छ. संभाजीनगर, प्रमुख पाहुणे: नागोराव कोम्पलवार, यवतमाळ प्रमुख पाहुणे: मा. द्रवेश जनबंधू, नागपूर, प्रमुख पाहुणे: मा. संतोष राऊत, गोंदिया, प्रमुख पाहुणे: संग्राम कुमठेकर, लातूर, प्रमुख पाहुणे: रंजना ब्राम्हणकर, गोंदिया व संस्थेच्या सचिव पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेच्या वतीने सविता धमगाये यांचा सत्कार शाल, सनमानचिन्ह व सन्मानपत्र देऊन अध्यक्ष राहुल पाटील व पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

नुकतीच मराठीचे शिलेदार समूहाचा राज्यस्तरीय सोहळा अनुभवून आली. कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. यावर्षी संत्रानगरीत नागपूर येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अतिशय सुंदर आणि दिमाखदार सोहळ्याचा अनुभव आला. अगदी दारातील रांगोळी पासून तर फेटेबांधणी पर्यंत सारे काही आगळे वेगळे होते. या संमेलनाच्या निमित्ताने एक अद्भुत असा अनुभव मिळाला.
या सोहळ्यात एकूण सात कवी-कवयित्री पुस्तक विमोचन झाले. त्यात माझा *सुगंधी जखमा* हा काव्य संग्रह ही होता.
मराठीचे शिलेदार समुहात खूप काही शिकायला मिळाले. मग ते कविता असो, चारोळी असो, चित्रचारोळी असो किंवा मग हायकू असो. इतरांच्या लेखनाचा अभ्यास करता करता नकळत माझाही अभ्यास होत गेला. मुख्य प्रशासक, संपादक, परिक्षण राहूलदादा आणि त्यांचे सह परीक्षक वैशाली ताई अंड्रसकर, तारकाताई रूखमोडे, सविताताई पाटील /ठाकरे, सुधाताई मेश्राम, हंसराजदादा खोब्रागडे, सुधाकर जी भूरके सर, संग्राम दादा कुमठेकर, उरकुडे सर या सर्वांचे मार्गदर्शन मिळत गेले. या सोहळ्याच्या निमित्ताने सर्वांशी प्रत्यक्ष भेटीचा योग आला. पल्लवी ताई पाटील यांना भेटता आले. याठिकाणी सविताताई पाटील /ठाकरे यांची उणीव मात्र प्रकर्षाने जाणवली.
काव्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक नवनवीन काव्याची मेजवानी मिळाली. कविता, गजल, पोवाडे, अभंग अशा अनेक काव्य प्रकाराचा आस्वाद घेता आला.

अजूनही मन तिथेच झुलते
अजूनही आठवणीने मन फुलते.

या सर्वात राहूलदादांच्या अपार कष्ट दिसून येत होते. आम्हा सर्वांना आवर्जून फेटे बांधायला लावले पण स्वतः मात्र फेटा नाहीच बांधला. पुढच्या वेळी जर राहूलदादांनी फेटा बांधला नाही तर मी सुद्धा फेटा बांधणार नाही. पक्क ठरवलं.
घरी आल्यावर दादांनी आवर्जून फोन करून विचारले. मी घरी पोहोचली की नाही ते. सर्व आवरेपर्यंत दादा सभागृहातच थांबले होते. सर्व राहीलेल्या साहित्याचे गठ्ठे बांधून मोटरसायकल वर लादून रात्री उशिरापर्यंत दादा घरी पोहोचले असतील. आपण काय कार्यक्रम संपला हात पुसत आपल्या वाटेने निघालो. मला खरंच खंत वाटली. थांबायला हवे होते मी. असं कसं निष्काळजीपणाने निघू आली.

सविता धमगाये
नागपूर
जि. नागपूर
*सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles