
वंदनीय नारी
जगतमाता लक्ष्मी वसते सर्वांघरी
शारदामातेचा वरदहस्त मुलांवरी….
माझी आई माझा पहिला आहे गुरु
तिच्यामुळे जीवन झाले माझे सुरू…
सावित्रीने शिक्षणाचा पाया रोवला
मुलींना शिक्षणाचा खंबीर आधार मिळाला….
जिजाईपोटी शिवबा जन्मला महान
बोध कथेतून रूजवला मनी स्वतंत्र विचार छान…
झाशीची राणी लढली मुलासवेत रणांगणी
“मेरी झाँशी नही दूँगी” बोलत होती अंगणी….
आनंदीबाई झाल्या पहिल्या डाॅ. महिला
मानाचे स्थान मिळवण्यात नंबर त्यांचा पहिला….
कन्येचे रूप खूपच हो देखणे गोजिरे
लावेल ती दिवे दोनही घरचे घर ठेवील साजिरे….
आई,बहीण,आजी,काकू,मामी,नानी
ही सर्व बाईची विविध नाती जागतात मनी…..
वंदनीय आहे संपूर्ण जगतात ही नारी
मान, सन्मान समाजात द्यावा तिला भारी…..
वसुमा नाईक,पुणे