
सावित्रीच्या लेकी आम्ही
सावित्रीच्या लेकी आम्ही
शिक्षणाची कास धरू
अज्ञानाच्या अंधकाराला
तडीपार करू
एक एक पावलाने
उंच भरारी घेऊ
स्वकर्तृत्वाच्या बळावर
आत्मनिर्भर होऊ
ना जातीभेद आणि
ना भेदभाव करू
मानवता एकच
धर्म तो पाळू
करूनी जनजागृती
भ्रुणहत्याला टाळू
होताच तिच्यावर अन्याय
त्याला ठेचून काढू
जनसेवेचे ते व्रत
घेण्यास सदैव तत्पर राहू
दिनदुबळ्यानां मदतीचा
चला हात देऊ
दाहिदिशा उजळण्यास
सर्व क्षेत्र पादाक्रांत करू
देशाच्या प्रगतीसाठी
हातभार लावू
सुधा अश्वस्थामा मेश्राम
अर्जुनी/मोर.गोंदिया
===========