सामूहिक कॉपी प्रकरणी केंद्र संचालकांसह आठ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल

सामूहिक कॉपी प्रकरणी केंद्र संचालकांसह आठ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुसद तालुका प्रतिनिधी

पुसद : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील काटखेडा येथील उच्च माध्यमिक विद्यालयात सामूहिक कॉपी प्रकरणी केंद्र संचालकांसह आठ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात काटखेडा येथील उच्च माध्यमिक विद्यालयात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यात थेट शिक्षक सहभागी असल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल परीक्षा विभागाने घेतली आहे. या प्रकरणी केंद्र संचालकांसह आठ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सध्या दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षा सुरळीत पार पडाव्या यासाठी शिक्षण विभागाकडून तयारी करण्यात आली आहे. यासाठी कॉपी मुक्त अभियान चालवण्यात आले आहे. मात्र, या अभियानाचा फज्जा उडल्याचे चित्र राज्यात आहे.

पुण्यातील दौंड येथे सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी ९ शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बुलढाणा पेपर फुटीप्रकरणी सात जण अटकेत आहे.

तसेच
बुलढाण्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव येथील बारावीच्या केंद्रावरुन गणिताचा पेपर फुटल्याची घटना समोर येताच राज्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी 36 तासात सात आरोपींना अटक केली असून यातील चार आरोपी हे खाजगी शाळेतील शिक्षक आहेत. राजेगाव केंद्रावरुन पेपर सुरु होण्याआधीच समाज माध्यमात व्हायरल झाल्याची बातमी आली आणि राज्यभरात एकच खळबळ उडाली होती.

त्यानंतर आता पुसद येथे हा प्रकार उघडकीस आला आहे.

त्यामुळे या प्रकरणी केंद्र संचालकांसह आठ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

काटखेडा येथील सेंटरवर बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या पेपर दरम्यान मोठ्या प्रमाणात काही जन बाहेरून कॉपी पुरवत होते. यासाठी या केंद्रावर मोठी झुंबड उडाली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles