
किरण राऊळवार यांची जवाहर बाल मंचच्या राष्ट्रीय समन्वयकपदी नियुक्ती
नागपूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ने महाराष्ट्रातून किरण राऊळवार यांची जवाहर बाल मंचचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. जवाहर बाल मंच ७ ते १८ वय असणाऱ्या मुला मुलींसाठी विकास, आत्मनिर्भरता, करुणा, देशभक्ती व नैतिक मूल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रचनात्मक कार्यक्रम करीत असते.
किरण राऊळवार यांनी युथ काँग्रेस इलेक्शन कमिटीचे आर.वो. म्हणून वेगवेगळ्या १५ राज्यात तसेच लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे अनेक राज्यात पर्यवेक्षक म्हणून कार्य केले आहे. त्यांचे कार्य लक्षात घेता अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ने जवाहर बाल मंच चे राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.
नियुक्तीचे श्रेय त्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांना दिले आहे. त्यांच्या नियुक्तीचे पक्षातील अनेकांनी, शहर काँग्रेस ओबीसी विभाग तसेच समाजातील वेगवेगळ्या घटकांनी आनंद व्यक्त करून स्वागत केले आहे.