
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना तितिक्षा इंटरनॅशनल काव्यजीवन गौरव पुरस्कार
वसुधा नाईक, प्रतिनिधी
पुणे: आंतरराष्ट्रीय किर्तीचे ज्येष्ठ कवी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या काव्यक्षेत्रातील दैदीप्यमान कारकिर्दीस नुकतीच 50 वर्ष पूर्ण झाली. याचे औचित्य साधून श्री एंटरप्रायजेस आणि तितिक्षा इंटरनॅशनल संस्थांच्या संयुक्त विद्यमाने, डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना तितिक्षा इंटरनॅशनल काव्यजीवन गौरव पुरस्कार-2023 जाहिर रित्या नुकताच प्रदान करण्यात आला.
अध्यक्षस्थानी गुरुद्वारा गुरुनानक दरबार कॅम्प संस्थेचे अध्यक्ष चरणजीतसिंह साहनी होते. याप्रसंगी तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष प्रिया प्रमोद दामले, ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर, भारतीय जनता पार्टीचे सांस्कृतिक विभागाचे शहर सरचिटणीस शैलेश बडदे, साहित्य गौरव संस्थेच्या कार्याध्यक्ष मंदाताई नाईक, ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर, नाट्य दिग्दर्शक सतीश इंदापूरकर, वर्ल्ड क्वीन बीजच्या अध्यक्ष सारिका सासवडे , मधुरंग संस्थेच्या निमंत्रक प्रतिमा काळे, भारत बेल्जियम मैत्री संघाच्या अध्यक्षा प्रिती दबडे, आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रिया प्रमोद दामले यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. कवयित्री सुवर्णा जाधव यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले. सदर पुरस्कार डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी सर्व काव्यरसिकांना कृतज्ञतापूर्वक समर्पित केला.वसुधा क्रिएशनच्या अध्यक्ष कवयित्री वसुधा नाईक यांनी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या नावावर
सर्वाधिक काव्यसंग्रहांचा विश्वविक्रम आहे तसेच ग्रामीण काव्यात हायकू, चारोळी प्रकार प्रथम आणल्याचा विश्व विक्रमही त्यांच्या नावावर आहे.पहिले विश्व काव्यसंमेलन, पहिले आंतरराष्ट्रीय ऑनलाईन निमंत्रित कवयित्रींचे काव्यसंमेलन, पहिले आंतरराष्ट्रीय प्रेम काव्य संमेलन, पहिले आंतरराष्ट्रीय ग्रामीण काव्य संमेलन, पहिली आंतरराष्ट्रीय गझल परिषद,पहिले दलित काव्यसंमेलन यासह हायकू, चारोळी आदि संदर्भातील अनेक आंतरराष्ट्रीय काव्य साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले आहे. साहित्यासह संपादन, एकपात्री.कार्यक्रम, ज्योतिष,
लघुपट, अनुबोधपट, हस्ताक्षर मनोविश्लेषण, व्यंगचित्र आदि विविध क्षेत्रात डाॅ.घाणेकर यांच्या नावावर 250 विश्व विक्रम आहेत. डाॅ.घाणेकर यांचे , आई, बे दुणे चकली, मधुरंग, संतुरधून, तावदान, निवद, तांभाटी,तुला सांगायच्या राहून गेलेल्या काही गोष्टी आदि काव्य संग्रह गाजले आहेत.डाॅ.मधुसूदन घाणेकर
हे गीतकार, संगीतकार तसेच गायक अशी तिहेरी भूमिका बजावतात. घुसमट, नक्षत्र डाॅट काॅम, पाऊस या लघुपटासाठी लिहिलेल्या आणि गायलेल्या गीत/गझल
करीता आंतरराष्ट्रीय पुरस्कारही डाॅ.घाणेकर यांना मिळाले आहेत.
भारतासह 17 देशात डाॅ.घाणेकर यांचे
सबकुछ.मधुसूदन ह्या विश्वविक्रमी एकपात्री.कार्यक्रमाचे 76,000 प्रयोग
झाले आहेत.जागतिक पातळीवर टाॅप 100 मधील विश्वविक्रमवीर म्हणून त्यांचा गौरव झाला आहे.विश्वमहात्मा ही सर्वोच्च आंतरराष्ट्रीय उपाधीही त्यांना प्राप्त झाली आहे.डाॅ.मधुसूदन घाणेकर हे डहाळी ह्या विश्वविक्रमी अनियतकालिकाचे संपादक
आहेत.2016 मधे 18 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांनी ‘रेग्युलस ‘ ता-यास ‘ सर डाॅ.मधुसूदन घाणेकर रेग्युलस तारा ‘ हे नाव जाहिर रित्या दिले आहे.