हक्कासाठी हा पेन्शन ‘लढा’

हक्कासाठी हा पेन्शन ‘लढा’पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

खरं म्हणजे आज थोडं मनातलं लिहावं असं वाटलं. जिथे बघा तिथे संपाचेच वारे फिरताना दिसत आहे. मी ही पण त्यातली एक सरकारी कर्मचारी. निवृत्ती ही जवळ आलीय आणि पेन्शनही लागू आहे मग मी का यात पडावे? पण मन कुठेतरी उद्विग्न होते. कर्मचाऱ्याविषयी सोशल मीडियावर काही काही बोलल्या जातय, काही काम चुकार असतात, लाच घेतात अजून बरच काही. पण हे सर्वांसाठी लागू नसतं काहीजण धान्याला कीड लागल्याप्रमाणे असतात.

काही जण अगदी प्रामाणिकपणे आपली नोकरी करत असतात आपले कर्तव्य बजावत असतात. असो हा संप आपल्या हक्कासाठी असून सरकारी कर्मचारी ज्यांना पेन्शन नाही त्यांच्यासाठी असून पेन्शन असणाऱ्यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा द्यावा. पण कुठे कुठे चित्र वेगळे दिसत आहे. लोक आपल्या भावना व्यक्त करतात कुणी शेतकऱ्याचे उदाहरण देऊन उगीचच या कर्मचाऱ्यांना बदनाम करतात खरोखरच फक्त कर्मचाऱ्यांच्याच मुळे शेतकऱ्यांचे नुकसान होतय का? मी पण एक शेतकरी घराण्यातीलच.. सासर माहेर दोन्हीकडे शेती.. मलाही कळकळ आहे शेतकऱ्यांविषयी धान्याला कापसाला भाव मिळत नाही यामध्ये सरकारच आडवे येतेय ना..! सरकार मालाला भाव देत नाही मग यात कर्मचारी दोषी का? प्रसंगी ते सुद्धा आपल्यावर झालेल्या यांच्याविरूद्ध लढा देतात आणि द्यायलाही हवा.. राहिला प्रश्न आत्महत्येचा… अरे ज्या शेतकऱ्यांना कर्ज घेऊनच सर्व कामे करावे लागतात तर तो खरंच त्याचे मनोबल इतके कमजोर असेल का? त्याला सर्वस्वी कारण हेच असतंय का?

मन सुन्न होतंय…गले लठ्ठ पगारवाले वरती बसलेले असतात वरून वयोमर्यादेचे वरदान ..!  सरकारी वेतन घेवून वर खाजगी कमाई पण भरपूर करतात आणि हे बरेच क्षेत्रात आढळून येते. कितीदा ते संपावर जातात आपल्या मागण्या मागतात, हक्कासाठी लढतात मग फक्त कर्मचाऱ्यांवरच अन्याय का? त्यांच्याच विरोधात का बोलले जाते ?अरे तो घर घेतो,गाडी घेतो पण त्याची पूर्ण हयात कर्जाचे हप्ते फेडण्यात जाते हे माहीत असते का ? उगीचच आपल्या हातात न येणाऱ्याला पकडण्याचा  प्रयत्न करायचा. म्हणतात श्रीमंत कर्मचारी..!  होय श्रीमंतच आहे कारण माणुसकीची श्रीमंती त्याच्यामध्ये बाकी आहे.तो कष्ट करून सर्व उभं करतो ,आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करतो. ही त्याची जबाबदारी असली तरी तो कमी आवक असून सुद्धा ती लिलया पेलतो.

नाण्याला दोन बाजू असतात मी एक वैद्यकीय कर्मचारी या नात्याने सांगू इच्छिते, की खरंच या संपामुळे खूप खूप नुकसान होत आहे. थोडं जर भटकलं तर वेगळं चित्र दिसायला येतं रुग्णांचे हाल होत आहेत त्यांच्या सर्जरी लांबणीवर पडल्यात कारण नर्सिंग  स्टाफ तिथे नाही प्रयोगशाळेतील चाचण्या थांबलेल्या आहेत किंवा त्या कुणाकडून करून घेतल्या जात आहे, निव्वळ कुठे कुठे वेळ काढू पणा सुरू आहे.बेरोजगार संघटना अर्ध्या वेतनात काम करायला तयार आहेत..इतकं सोपं असतंय का? घोड्याची कातडी गाढवाला लावली तर तो घोडा बनणार नाही..आणि हे शक्य आहे का? कुणीही कुणाचं काम ट्रेनिंग शिवाय करू शकत नाही.. मला जास्ती या विषयावर बोलायचं  नाही पण मन खिन्न होतंय ..! पण हाच कर्मचारी जेव्हा कोविडच्या साथीमध्ये आपल्या जीवावर उदार होऊन एकही रजा न घेता जेव्हा आपल्या कर्तव्यावर जायचा तेव्हा काय हाल व्हायचे ते त्यांनाच माहिती. उद्याचा दिवस कसा उजाडेल हीच भीती ..सोबतची व्यक्ती श्वास सोडताना दिसत होते . पण याबद्दल कुठेच वाच्यता नाही तोच सरकारी कर्मचारी महानगरपालिकेचा, वैद्यकीय, पोलीस वाले शेवटी फक्त हेच कार्यरत होते. पण सरकारी कर्मचारी मात्र “जिना यहा मरना यहा” प्रमाणे तिथेच पिचत आहे… पुढाऱ्यांना तीन,पाच वर्षे कार्यकाळ बजावून नंतर पेन्शन दिल्या जाते मग नुकसान होत नाही किंवा सरकारी तिजोरीवर भार पडत नाही का? सर्व प्रश्न च..! जर आज ते हक्क मागतात आहे तर का नाही त्यांना पेन्शन मिळावे? संविधानाने सुद्धा पेंशन चा हक्क दिलेला आहे मग का न मिळावी? तो आपला हक्क आहे..निवृत्तीनंतरचा आधार आहे..शासन कुटुंब पेंशनचे आमिष दाखवून कर्मचाऱ्याचे मुसक्या बांधून तोंड बंद करू पाहताहेत. कर्मचारी संघटित होऊन लढा देत आहे आपल्या हक्कासाठी….!! निवृत्तीनंतरचा एकच आधार ..!                   

                    लढू या एकजूट होऊनी 
                     फडकवू या पेन्शनचा झेंडा
                     एकच मिशन जुनी पेन्शन 
                      हक्क हाच आमचा अजेंडा

रेखा सोनारे
नागपूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles