प्रेरणा कशास म्हणतात?

प्रेरणा कशास म्हणतात?पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

न्यूटनच्या वर्गात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही ५० विद्यार्थी होते…!!!!
आईन्स्टाईनचा वर्गही काही रिकामा नव्हता…!!!!
बाबासाहेब तर वर्गाबाहेर बसून नुसतंच ऐकायचे…!!!!
यांच्या मास्तरांनी सगळ्या वर्गाला एकसारखेच ज्ञान दिले होते…!!!!

मग त्यांच्यातले हे एकएकटेच एवढे का शिकले…???
तुकोबा ज्ञानोबा तर शाळेतच गेले नव्हते…!!!!
शिवबांनी युद्धनीती कुठल्या मास्तर कडे शिकली होती…???
तेंडुलकरच्या मास्तरांनी किती सेंच्युरी मारल्या होत्या…???

आंबेडकरांच्या मास्तरांना किती घटना लिहिण्याचा अनुभव होता…???
हे सगळेच शिकले कारण त्यांना शिकायचे होते…!!!!
मास्तरांचे क्वालिफिकेशन त्यांच्या दृष्टीने गौण होते…!!!!
सिलॅबसचे बंधन त्यांनी स्वतःस घातले नव्हते…!!!!

आम्ही त्यांना देव मानून मोकळे होतो आणि आमचेच हात बांधून ठेवतो…!!!!
आमच्या अपयशाचे खापर आमच्याच मास्तरांच्या अज्ञानावर फोडून मोकळे होतो…!!!!
भरपूर फी घेणाऱ्यांना ज्ञानी म्हणतो आणि त्यांचे खाजगी क्लास लावतो…!!!!
पण माझे शिक्षण त्यांच्या ज्ञाना मध्ये नाही हे सोईस्कर विसरतो…!!!!

पैसे देऊन प्रयत्न विकत घेण्याचा विनोद आम्ही करतो, आमच्या मनालाच आम्ही फसवत राहतो…!!!!
माकडांचे उड्या मारण्याचे क्लासेस कुणी बघितले आहेत का…???
कि बदकांचे पोहण्याचे क्लासेस कुठे चालू आहेत का…???
वाघिणीच्या शिकारीच्या क्लासेसच्या ऍडमिशन्स फुल झाल्याच्या बघितल्या आहेत का…????

लंगड्या माकडीणीची पोरं उड्या मारायला शिकलीच नाहीत असं कुठं झालंय का…???
आंधळ्या वाघिणीची मुलं कंद मुळं खाऊन राहिलेली कुणी पाहिलीत का…???
निसर्गामध्ये कुणीच कुणाला शिकवत नसतो, ज्याची त्याची गरज म्हणून जो तो शिकत असतो…!!
प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा मास्तर असतो….!!

शिक्षक फक्त आपले भरकटलेपण दाखवितो, यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो…!!
आकाशा खालचं सगळं जग हाच ज्याचा त्याचा सिलॅबस असतो…!!
शिक्षकांचा दर्जा शिक्षणाचा दर्जा शाळेचा दर्जा कॉलेजचा दर्जा ह्या सगळ्याला दोष दिला जातो कारण माझ्या प्रयत्नांचा दर्जा खूपच खालावलेला असतो…!!

डॉ. ज्ञानेश्वर माशाळकर, धाराशिव
=========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles