
एचआयव्ही ग्रस्तचा विवाहित महिलेसोबत शारीरिक संबंध
पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद: वसंत नगर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील पंचवटी हनुमान मंदिर जवळ राहणाऱ्या व्यक्तीने एका विवाहित महिले सोबत एक वर्षापासून शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते.
विवाहित महिलेस आरोपीला एचआयव्ही असल्याची माहित होताच त्यांनी संबंध तोडले.तरी देखील त्यांनी जबरदस्तीने पुन्हा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी वसंत नगर पोलिस स्टेशन मध्ये दि.२२ मार्च २०२३ रोजी पिडीतेने तक्रार दिली आहे.
तक्रारीच्या आधारे आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काकडदाती ग्रामपंचायतच्या हद्दीतील महालक्ष्मी नगर येथे राहणाऱ्या ३८ वर्षीय विवाहित महिलेने तक्रार दिली असता आरोपी याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.वसंत नगर पोलीस स्टेशनच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिडीत विवाहित महिलेला सोळा व तेरा वर्षाचे मुले आहेत.पीडीतेचे आरोपी सोबत सुमारे एक वर्षापासून ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेम संबंधात झाले.अशातच दोघांनीही शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित महिलेला आरोपीने एचआयव्ही असल्याचे सांगितले असता त्याने लगेच संबंध तोडले.
त्या महिलेनेही शासकीय दवाखान्यांमध्ये एचआयव्हीची तपासणी केली असतात तिला एचआयव्ही नसल्याचे समजल्याने तिने सुटकेचा श्वास सोडला होता.
दि.२१ मार्च २०२३ रोजीच्या दुपारी दोन वाजता च्या दरम्यान पीडित विवाहित महिला त्यांच्या पतीचा डबा घेऊन काकडदाती ऑटो पॉईंट जवळ आल्या होत्या.अशावेळी आरोपीने दुचाकीवर येऊन अडवणूक केली व दुचाकीवर बस असे सांगितले. तसे न केल्यास तमाशा करतो असे सांगितल्यावर पीडिता बदनामीच्या भितीने दुचाकीवर बसली. आरोपीने त्या विवाहित महिलेला पंचवटी हनुमान मंदिर येथे राहत्या घरी घेऊन आला.व तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. घाबरलेल्या पिडीतेने पतीला घडलेली हकीकत सांगितली असता वसंत नगर पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरोधात तक्रार दिली आहे.
आरोपी घटनेपासून फरार असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे.प्रकरणाचा अधिक तपास पीएसआय ज्ञानेश्वर ढवळे करीत आहे.