वसुधा नाईक यांची अध्यक्षपदी निवड

वसुधा नाईक यांची अध्यक्षपदी निवड



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुणे : 19 मार्च 2023 : आंतरराष्ट्रीय विचारवंत आणि विश्वविक्रमवीर डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी स्थापन केलेल्या वसुधा क्रिएशन या संस्थेच्या
अध्यक्षपदी वर्ल्ड लीटरेचर संस्थेच्या निमंत्रक वसुधा नाईक यांची निवड करण्यात आली आहे.

बालकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ही संस्था कार्यरत राहणार असल्याचे डाॅ.घाणेकर यांनी सांगितले.वसुधा नाईक साहित्यिक असून त्यांना नुकताच इंटरनॅशनल पोएटेस स्पिरिच्युअल अवॉर्ड प्राप्त झाला आहे. ‘रमाची पाटी’या वसुधा नाईक यांच्या कथेवरील आधारीत लघुपटासाठी,त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार झाले आहेत.त्यांच्या नावे दोन कवितासंग्रह असून एक कथासंग्रह (E.Book) प्रकाशन मार्गावर आहे.
1. ‘गुंजन मनिचे ‘काव्यसंग्रह
2. ‘शब्द फुलांची ओंजळ ‘काव्यसंग्रह
3. वसुधाची कथा पुष्पे

जवळजवळ सहा वेळेला राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. ‘रमाची पाटी’ या त्यांच्या शॉर्ट फिल्म साठी 45 अवॉर्ड्स मिळालेले आहेत. राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहु उद्देशीय संस्थेद्वारे पर्यावरण मित्र म्हणून पुरस्कार देण्यात आला. तसेच अण्णा हजारे यांच्याकडून आदर्श शिक्षिका हा पुरस्कार देण्यात आला. साई अर्पण संस्थेद्वारे महाराष्ट्र आयकॉन महाराष्ट्र सन्मान पुरस्कार देण्यात आला.

मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेद्वारे गुणवंत शिक्षक, साहित्य गंध पुरस्कार,तसेच कवी कुसुमाग्रज पुरस्काराने सन्मानित केले आहे. श्री शरद गोरे यांच्याकडून ‘पुणे शहर संघटक’ अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद त्यांच्याकडून लाभले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles