
चमचाभर जिंदगी
चमचाभर जिंदगीतून गळला
कितीदा एक एक थेंब….
कधी जीवघेण्या संकटांनी घेरले,
तर कधी साधला कोरोनानेही नेम….
प्रत्येक गळणाऱ्या थेंबातून
आयुष्य कमी झाले,
रिता होत चमचा म्हणाला
अग..जगणे तर राहून गेले…
मने सांभाळीत इतरांचे
तुझ्या इच्छेस कधी गमाविले
आवाज तुझ्या अंतर्मनाचे
तू आतल्या आत शमविले…
जोवरी होते अंगात बळ
सेवक घरादाराची झाली
असाध्य आजाराने मात्र आता
संगत तूझी केली…
आयुष्याचा एक एक क्षण
डोळ्यासमोर येऊ लागला…
चमचाभर जिंदगी चा आता
अर्थ तुजला कळू लागला…
प्रत्येक श्वासास करीत विनंती
संवाद अंतर्मनाशी सुरू झाले
रिता होत चमचा म्हणाला..
अग..जगणे तर राहून गेले..
जगणे तर राहून गेले…
संध्या मनोज पाटील अंकलेश्वर
=========