
किमयागार
हे परमेश्वरा निर्गुण निराकार
संपूर्ण सृष्टीचा आहेस तू किमयागार.!
स्त्री पुरुष निर्मिती तुझीच रूपे
संयोग दोघांचा होता नव जीव तयार होते
मातेच्या गर्भात मग घेते ते आकार.
संपूर्ण सृष्टीचा आहेस तू किमयागार!
पृथ्वीच्या परिवलणाचे गणित वेगळे
रात्र न दिवस त्यामुळे तर घडे.
ऊर्जा स्रोत सूर्यास ठेवून केला चमत्कार.
संपूर्ण सृष्टीचा आहेस तू किमयागार!
निसर्ग चक्राची नैसर्गिक घटना
परस्परावलंबी ही तुझीच रचना.
उदय अस्ताचा खेळ मांडूनी केला कार्यभार.
संपूर्ण सृष्टीचा आहेस तू किमयागार!
प्राजक्ता आर खांडेकर
सुगत नगर, नागपूर
===========