
भ्रमाचा भोपळा
भविष्याच्या वार्धक्य चिंतेने
ह्रदयात ते शर घुसे…..
तारुण्याच्या मनगटा प्रमाणे
बळ न छातीत हिमंत नसे….
आयुष्यभराची जी जमापुंजी
संसारच्या रहाटगाडग्यात होती नष्ट….
सुरकुतलेल्या हातामध्ये ह्या
हरते उमेद करण्यास कष्ट…..
म्हातारपणाचा ओलांडता उंबरठा
नात्यांची ही रंग पडते फिके…..
आबालवृद्धांची ऐकता करुण कहाणी
मानवता ही पडे थिटे….
माझे सर्व म्हणता म्हणता
उरतोय शेवटी तो हाडाचा सापळा….
जाता वेळ येई अक्कल ठिकाण्या
फुटतो मग तो भ्रमाचा भोपळा…..
थरथरत्या त्या हाती हात
देण्या कोणी घालावी साद…..
चार पै जर गाठीस राहतील
उठतील न मग कोणते वाद…..
खाचा पडलेल्या डोळ्यामध्ये
असावीत स्वप्ने नसावे टेंशन……
देऊनी आम्हास आमचा हक्क
करावी प्रदान ती आमची जुनी पेंशन…..
करावी प्रदान ती आमची जुनी पेंशन…..
सुचिता नाईक
देगलूर, जि.नांदेड