पुसद डीबी पथकाची उमरखेड येथे धाड

पुसद डीबी पथकाची उमरखेड येथे धाड



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_धाडीत दोन आरोपीला घेतले ताब्यात_

_एक गावठी पिस्तूलासह पाच जिवंत काडतूस जप्त_

तालुका प्रतिनिधी, पुसद

पुसद: शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील दोन आरोपीला डीबी पथकाने उमरखेड येथे धाड टाकून दि.२९ मार्च २०२३ रोजी ताब्यात घेतले आहे.आरोपीकडून एक गावठी पिस्टल मॅगझीनसह पाच जिवंत काडतुसे जप्त केले आहे.दोन्ही आरोपीला शहर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

उमरखेड येथे राहणाऱ्या मोहम्मद याहीया अब्दुल अजीज रा.हनुमान वार्ड व शेख रहेमान शेख इस्माईल रा.टिळक वार्ड असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय शस्त्र अधिनियमाचे तपास दरम्यान दोन्ही आरोपीला पकडण्यासाठी उमरखेड येथे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड ,अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागी पोलीस अधिकारी पंकज अतुलकर,शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख अनिल सावळे, पोलीस अमलदार प्रफुल इंगोले, शुद्धोधन भगत,आकाश बाभुळकर, वैजनाथ पवार यांनी सापळा रचला होता. आरोपीकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह पाच जिवंत काडतूस असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles