स्वप्नकिनारा

स्वप्नकिनारा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रेमविलास करण्याचा मिळाला आज मोका
प्रेमसागरात डुबू , देणार नाही गं धोका !!धृ!!

प्रेमनौकेत बसून गाठू दोघं स्वप्नकिनारा
भव्य या तारांगणी प्रेमाचा घालेन वारा
नभांगणी चमकतोय एकाकी शुक्रतारा
देहशिल्प पाहून देहभान विसरला रानवारा !!१!!

चांदण्या रात्री नाव नेऊ अलगद पैलतीरी
स्वप्नकिनारा गाठताच स्वप्नपुर्ती करू सारी
स्वप्नमहाली उधळू मकरंदाचा प्रेमगंध
स्वप्नकिनारी चढवून साज चाखू गं मधुगंध!!२!!

खुललंय तारांगण नभी, बहरलंय प्रेमांगण छान
मिठीत सखे तुझ्या पेटलंय ओलचिंब रान
स्वप्नकिनारा गाठेपर्यंत मनाला किती आवरू
दोलायमान होता नाव ऐकमेकास सावरू !!३!!

घाबरू नको मनी दीपस्तंभ हा साथीदार
स्वप्नकिनारा दाखविणारा हा हाय शिलेदार
नाक तुझे चाफेकळी सुंदर दिसते गालावर खळी
स्वप्नकिनारा गाठताच खुलेल गं गुलाबकळी !!!४!!

तुझ्या माझ्या मिलनास झोका देतोय सागर हळुवार
ऐकमेकांच्या साथीत मानू ना कधी संकटापुढे हार
स्वप्नकिनारा गाठताच हळूच स्वप्नमहालाचे उघडू दार
हसत झेलू शब्दांचा वार प्रेम हेचं जीवनाचे सार !!५!!

मनाचा घेतला अचूक ठाव जाणला हृदयाचा भाव
प्रेमविलास करता करता स्वप्नकिनारी आली नाव
मधुगंधाचा सुटेल दरवळ धुंद होतील रानवेली
स्वप्नकिनारा गाठताच हास्य खुलले गं चिंब गाली !!६!!

संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles