सात दिवसीय धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे आयोजन

सात दिवसीय धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे आयोजनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुसद तालुका प्रतिनिधी

पुसद: धम्मनायक सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने ०७ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत पुसद येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात धम्मक्रांती प्रज्ञापर्व २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक ८ एप्रिल रोजी भीम शाहीर संभाजी भगत व संच मुंबई यांचा आंबेडकरी जेलसा इनकी सुरत को पहचानो भाई इनसे संभल के रहना रे भाई फेम यांचा कार्यक्रम होणार आहे.
दिनांक ९ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्रीविषयक योगदान या विषयावर दिशा पिंकी शेख. व ज्योती खंदारे यांचे मार्गदर्शन होणार आहे.
दिनाक १० एप्रिल रोजी भारत देशाच्या उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान या विषयावर प्रवीण देशमुख व प्रा.माधवराव सरकुंङे प्राख्यात वक्ते व साहित्यिक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
दिनांक ११ एप्रिल रोजी आंबेडकरी चळवळीतील युवकाची भूमिका या विषयावर नितीन चंदनशिवे दंगलकार व प्रा.सय्यद सलमान यांचे मार्गदर्शन होणार आहे.
दिनांक १२ एप्रिल ला मी वादळ वारा फेम अनिरुद्ध वनकर यांचा भीम गीत गायनाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे.
दिनांक १३ एप्रिल रोजी महाङचा मुक्ती संग्राम आणि भारतीय नागरिकांचे संविधानिक हक्क या विषयावर डॉ. यशवंत चावरे माजी न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई यांचे मार्गदर्शन होणार आहे.
दिनांक १४ एप्रिल शुक्रवारला महामानव विश्व भूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी सकाळी ७:३० वाजता पंचशील ध्वजारोहण सामूहिक बुद्ध वंदना व मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण व समता सैनिक दलाची मानवंदना होणार आहे.सकाळी ९ वाजता मोटर सायकल रॅली,दुपारी ४ वाजता भव्य अभिवादन रॅली व रात्री१० वाजता समारोप सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात येणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये धम्मक्रांती प्रज्ञापर्व २०२३ चेअध्यक्ष किशोर कांबळे सचिव प्रा.अंबादास वानखेडे यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन कोषाध्यक्ष परमेश्वर खंदारे. यांनी केले आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष एन.आर.वाहुळे यांनी व्यक्त केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles