पुसद न.प. च्या दुकानाची भाडेकरुनी केली परस्पर विक्री

पुसद न.प. च्या दुकानाची भाडेकरुनी केली परस्पर विक्रीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पुसद तालुका प्रतिनिधी

पुसद: शहरातील महात्मा गांधी चौक ,सुभाष चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,जुन्या सरकारी दवाखाना समोर, तसेच आठवडी बाजार मार्केट मधील दुकाने काही मूळ भाडेकरूंनी कमी पैश्यात घेवुन लाखो रुपयांत परस्पर विकल्याची शहरात जोरदार चर्चा आहे.
संबंधित भाडेकरूंवर कोणत्याही प्रकारची नियमानुसार कार्यवाही करण्यात आलेली नगरपरिषदेची दुकान गाळे काही व्यापाऱ्यांनी आपले नावे करून इतर व्यापाऱ्यांना ज्यादा दरात परस्पर विकलेली आहेत.पुसद नगर परिषद मात्र दुकानाच्या अल्प भाड्यावरच समाधानी आहे.त्यामुळे पुसद नगर परिषद ला करोडो रुपयांचा नुकसान होत आहे.
मुळ दुकानदार नगर परिषद च्या दुकाने इतर व्यक्ती ला विकुन लाखो रुपये कमाई करीत आहे. पुसद नगर परिषद च्या चाळीस टक्के दुकाने मुळ भाडेकरुनी इतर व्यावसायिकांना परस्पर विक्री करुन ताब्यात दिले आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
नगर परिषदेच्या वतीने सुमारे ४० ते ५० वर्षांपूर्वी पुसद शहराच्या मध्यभागी असलेल्या मुख्य बाजाराजवळ दुकाने काढून मार्केटचे बांधकाम करून अंदाजे ४०० पेक्षा जास्त दुकाने बांधली होती. तत्कालीन नगरपालिका प्रशासनाच्या वतीने दुकाने अनेक व्यावसायिकांना मासिक भाडे तत्त्वावर देण्यात आली.तर काही दुकाने बिना भाडे वापरले जात असुन त्या अवैध दुकानाच्या वापर करणाऱ्या लोकावर कार्यवाही करण्याची हिम्मत न.प. असल्याचे दिसत नाही.
नगर परिषद च्या अधिकाऱ्यांना फक्त हातगाडी, फळे,व भाजीपाला विकणाऱ्या निराधार लोकांचे अतिक्रमण दिसतात असा आरोपही केल्या जात आहे.
अतिक्रमण हटाव मोहीम राबवून गरिबांच्या अतिक्रमण दुकाने हटवून आर्थिक नुकसान केले आहे.परंतु नगर परिषदेच्या मालकीच्या दुकानाचा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय होत असल्याची माहिती असताना व नगर परिषद च्या मालकीची दुकानात अवैध पणे ताब्यात घेऊन व्यापार करणाऱ्या वर कार्यवाही न करण्याचे कारण काय? असा प्रश्न ही उपस्थित केल्या जात आहे.न.प.प्रशासन मूग गिळून का ? अशी जन भावना व्यक्त केल्या जात आहे.
पुसद शहराचा दिवसेंदिवस वाढता व्याप बघता मार्केटमधील मूळ भाडेकरूंनी आपली दुकाने इतर व्यावसायिकांना लाखो रुपये घेऊन दिल्याची माहिती आहे. वास्तविक असे व्यवहार करताना पुसद नगर परिषद प्रशासनाला विश्वासात घेऊन तशी परवानगी घेणे आवश्यक होते. नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी नगरपालिकेचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने काहीच केले नसल्याने जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी चौकशी करण्याकरिता करिता समिती गठीत करून कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून केल्या जात आहे. वरिष्ठ अधिकारी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन कार्यवाही करणार की नाही याकडे शहरवासी यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles