पाठराखण

पाठराखण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

लढा, लढू जुन्यापेंशन साठी
सदैव तुमची सोबत करणार,
हक्क आणि न्यायासाठी
कार्य जिद्दीने तडीस नेणार.

कळला आम्हास अर्थ नवा
आपलेपणा अन मित्रत्वाचा,
गाफिल ठेऊन दगफटका झाला
अर्थ कळला फितूरीचा.

तरुण आम्ही सारे एक
जमू विचार घेऊन नेक,
संघर्ष हा, स्वाभिमानासाठी स्वहितासाठी करू देखरेख.

साद घाला तुम्ही आम्हाला
पाठराखण कायम करणार,
तुमच्या आधी सजा आम्हांला
स्वखुशीनें सामोरे जाणार.

स्वतःसाठी जगता जगता
परहिताचा विचार करावा
वेळ प्रसंगी, आपुल्या
सुखाचाही त्याग करावा.

लढा देणे, मार्गक्रमण करणे
सर्वांचें हित ध्यानी ठेवावे,
दिशादर्शक कार्य करण्यासाठी
ध्येय आमुचे, विशाल असावे.

संदेशवाहक आम्ही सारे
सत्याचीच सोबत करणार
आत्मविश्वासाने जगून
स्वाभिमान कायम ठेवणार.

सेवानिवृतीनंतर गात्रे थकतील
सगेसोयरे साथ सोडतील
आजारपण सारे बलावतील
मग सांगा?उदरनिर्वाह तें कसे करतील?

संपलढा फक्त नव्याचाच नव्हूता
तो साऱ्यांचा आत्म सन्मान होता,
आपले अन परके कळले सारे
भेदी हा कोणी दूरचा नहूता.

आज केलेली पाठराखण
उद्या दिशादर्शक ठरणार,
ऐतिहासिक यशाची नोंद
जुनी पेन्शन लढ्यात साक्ष ठरणार.

मायादेवी गायकवाड
(मानवत)परभणी
सदस्या मराठीचे शिलेदार समूह.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles