एक पत्र वृद्धाश्रमास

एक पत्र वृद्धाश्रमासपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

ll श्री ll
प्रति,
मा.व्यवस्थापक साहेब
सप्रेम नमस्कार
विषय: आपल्या अमूल्य सेवेसाठी आभार

महोदय,
सविनय पत्राव्दारे कळविते, की आपल्या वृद्धाश्रमात आमच्या वृद्ध माता पित्यांना, गरजू आप्तेष्टांना आदराने आश्रय दिला, आधार दिला त्याबद्दल प्रथम आपले मनापासून आभार. माझ्या दूरच्या नात्यातील आत्या, मामाजींना भेटण्यास आपल्या वृद्धाश्रमात आले. त्यावेळी तिथले शांत वातावरण मनमोहून गेले. लग्नाला ४० वर्षे होऊनही संसारी फुलं उमलले नाही, ही वेदना काय कमी होती? तर आता म्हातारपणी सुद्धा जीवनाची व्यवस्था कशी होईल याची कल्पनाही नव्हती. पण आपल्या इथे आयुष्य गमावलेले, वेदनांचे माप ओलांडलेले, काही सुख गमावलेले, काही मनोधैर्य खचलेली,आयुष्यात हरलेली अनेक व्यक्ती बघितले आणि मन हेलावून गेले.

झिंगत पडण्यापेक्षा आपला आश्रय घेऊन उरलेलं आयुष्य तरी चार लोकांच्या सहवासात घालवता येतात. मनातील दडपण, ताण तणाव लपवून ठेवता येतात. निरोप तर सर्वांनाच घ्यायचे आहे; पण वास्तव विसरून चालत नाही.संसारी अपयशी ठरले म्हणून, आयुष्य टिकवण्यासाठी एकमेकांचा साथीदार बनून जगत आहेत. सगळ्यांना, सगळ्याच गोष्टी मिळतात किंवा उपलब्ध होतात असे नाही. पण आयुष्यात खचलेले, उदास मनानी येथे येणाऱ्याच्या जीवनाचे नंदनवन फुलवण्याचे काम आपण करता. साऱ्या दुःखावर पांघरूण घालत, नव्याने दिवसाची सुरुवात करणे थोडे कष्टाचे आहे.

एकंदरीत परिसरातील विविध रंगीबेरंगी फुल झाडांनी मनमोहून गेले. तसेच विविध ठिकाणाहून आलेल्या कोमेजलेल्या भावभावनांना उमलत ठेवण्याचे कार्य बघून मन भारावून गेले. वृद्धाश्रमात राहणारे सर्व वृद्ध सारख्याच वयाचे सारख्याच मनोभावानेचे नसतात. परंतु त्यांच्या आचार विचारात कुठेतरी एकसूत्रता जाणवते, ती म्हणजे आपल्या पाल्यांना दोष देणारे फार कमी आढळतात. पाल्य कसेही वागले तरी, त्यांच्या चुकांवर पांघरून घालून मन मारून जगण्याची सवय जणू त्यांना झालेली असते. आपला कर्मचारी वर्ग उत्स्फूर्तपणे सर्वांना जपत असतो.काय हवे नको ते बघतो, काळजी घेतो. आजारपण तसेच विविध व्याधींनी ग्रासलेले, मनोबल ढासळलेले असा गोतावळा आपण जपता. वेळप्रसंगी औषधोपचार देऊन योग्य काळजी करता. मायेचा हात फिरवता. विरंगुळा म्हणून त्यांच्यात विविध विषयावर चर्चा सुद्धा घडवून आणता. बाहेरच्या जगाशी त्यांना जोडून ठेवता. आपण टाकाऊ आहोत ही भावना त्यांच्या मनात शिरकाव करू देत नाही. त्या घटकाला आपण परिचित आहोत ही जाणीव देता. मन एकमेकात गुंतले म्हणजे मनातील सुखदुखांची देवाण-घेवाण आपोआप होते.

आयुष्याच्या एका संध्येला प्रणाम करण्यासाठी वृद्धांचे हात सबळ होतात. एवढीच काय ती अपेक्षा असेल त्या माऊल्यांची. त्यांच्या डोळ्यातील पाण्यात अजूनही चमक आहे. कुठलीतरी आशा त्यांना जगण्यासाठी तग धरून आहे. सुकलेला चेहरा, सुरकुतलेली कातडी, भुकेले डोळे, थरथरणारे हात, पिकलेले केस त्यांच्या आयुष्याची अनुभूती दाखवून देत होती. प्रत्येकाची विशिष्ट खोली,आवश्यक सामान, झोपण्यासाठी अंथरूण,बाहेर मोकळी जागा वाटेल तेवढी फिरता येईल अशी. शेवटी आलिशान बंगल्यातून केविलवाणी होऊन आपल्या आश्रयास येणाराही इथे सुखावून जातो आपल्या सहवासाने. आयुष्याच्या शेवटाला कर्मच उरते. पण जीव असेपर्यंत अनेक दिशांना जाऊन आयुष्याची दशाही बदलतेच. शेवटच्या घटकाला निरव शांततेत पहुडलेलं त्यांचे देहसुद्धा अंतिम खाणाखुणा सोडून जातो तेव्हा त्यांच्या स्मृती कायम वृद्धाश्रमात कोरले जातात.
जशी परिसरातील हिरवळ; तशी मायेची पांघरून घालणारी दरवळ आपल्या संस्थेमध्ये दिसून आली. इतके उदात्त काम करण्याची प्रेरणा आपल्याला सतत लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
फुलाने सुगंधासाठी
वाऱ्याने वाहण्यासाठी
वृद्धश्रम असावीत
निराधारांच्या सेवेसाठी
आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा.

आपली शुभचिंतक
अ. ब. क.

वनिता महादेव लिचडे
त.पवनी, जि.भंडारा
====

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles