
बाबासाहेब नाईक अभियांत्रिकीत सांस्कृतिक मेळावा
पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद: बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय, पुसद येथे सांस्कृतिक कार्यक्रम ‘गेटी २०२३’ दि. ०७ एप्रिल व दि.८ एप्रिल रोजी उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य डॉ. अविनाश वानखडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रा. जि.के. गट्टानी, डॉ. एस.एस. भागवत, प्रदीप दुधाट, प्रभारी प्राध्यापक, यथार्थ तत्वादी अध्यक्ष विद्यार्थी मंडळ व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. अविनाश वानखडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रत्येकाच्या जिवनातील महत्व व व्यक्तीमत्व विकासासाठी त्याची असलेली गरज यावर भाष्य करुन या सांस्कृतिक व्यासपीठाचा व्यक्तीमत्व विकासासाठी सर्वांनी फायदा घेण्याचे आवाहन करुन सर्व विद्यार्थी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
या सांस्कृतिक मेळाव्यात गितगायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, पारंपारिक वेशभुषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमात सर्व स्पर्धकांनी उत्साहाने भाग घेवुन त्यांच्या केलेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलागुणांना सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या सर्व स्पर्धकांचे प्राचार्यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख महाविद्यालयीन विकास समिती सदस्य, प्राध्यापक वृंद, सहकारी कर्मचारी व संस्थेचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जय नाईक यांनी सर्वांचे अभिनंदन केले.