
खूप नको इतके बास
हातामध्ये पुस्तक आहे
डोळ्यावर चष्मा आहे
संत संगतीला वेळ आहे
इतके मला बास आहे
मोबाईल आहे सोबतीला
मित्र आहेत बोलायाला
मित्र माझे खास आहेत
इतके मला बास आहे
पायामध्ये त्राण आहे
छातीमध्ये प्राण आहे
देहामध्ये श्वास आहे
चालायला इतके बास आहे
डोक्यावरती राहयला छत आहे
शिक्षकाची नोकरी करतो
कष्टाचे दोन पैसे आहे
जगायला इतके बास आहे
हातामध्ये खडू आहे
अक्षरांचा सुगंध वास आहे
शाळेतील लेकरं ईश्वरी रूप आहे
खरंच इतके बास आहे
याहून तुला काय हवे
हवे हवे सतत सवे
हव्याचाही हव्यास
आवर आवर पुरे बास
कशासाठी धावाधाव
ध्रुवाकडून ध्रुवाकडे
एकांताचा एकच ध्यास
वेड्या मना, इतकेच बास
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
जि. धाराशिव
=====