
‘शिक्षकच घडवतात विद्यार्थ्यांचे आयुष्य’; डाॅ.मधुसूदन घाणेकर
सौ.वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे
पुणे/ तळवडे: ” शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत तर त्यांच्यावर चांगले संस्कार घडवतात.विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनाचा मार्ग घडवतात. एकप्रकारे ते विद्यार्थ्यांचे आदर्श ठरावे असे आयुष्यच घडवतात.” असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय विचारवंत, कलावंत आणि पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.
स्वामी विवेकानंद प्राथमिक
विद्यामंदिर येथे ,शिक्षक परिपाठ उपक्रमात ते शिक्षकांना मार्गदर्शन करीत होते. श्री.धनसिंग परदेशी सरांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. शिक्षिका सौ.शीतल गायकवाड यांनी अतिथी परिचय आणि सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक श्री.एकनाथ आंबले सर यांच्या शुभहस्ते
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी त्यांच्या विश्वविक्रमी ‘सबकुछ मधुसूदन ‘ ह्या एकपात्री.कार्यक्रमात शीळवादन, उपस्थितांच्या हस्ताक्षरावरून तात्काळ
मनोविश्लेषण, बालपणीचे दिवस, काॅलेजमधील दिवस, गावाकडचे दिवस, जुन्या गाण्यांवर आधारीत असलेले स्वतःचे फिल्मी किस्से, रफी..किशोर..मुकेश..पं.भीमसेनजी..
सुलोचनाबाई चव्हाण यांच्या गाण्यांची झलक,भाग्यांक..कुंडली ..हस्तसामुद्रीक या विषयक गमतीजमती आदि विविध आविष्कार सादर करुन सर्व रसिकांची मने जिंकली.
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा सबकुछ मधुसूदन ह्या विश्वविक्रमी एकपात्री कार्यक्रमाचा हा 76419 वा प्रयोग होता.समारोपात डाॅ.घाणेकर यांनी हसरी शिक्षक मंडळी आणि हस-या बालांना हाहाहाsssलाफ इंटरनॅशनल ॲवाॅर्डस प्रदान केले.