
पंतप्रधानांच्या ‘मनकी बात’ची शतकपूर्ती
_पुण्यात गोखलेनगरमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन_
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
पुणे: सन 2014 पासून सलग 100 महिने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनतेशी संवाद साधणारा ‘मन की बात’ या शीर्षका अंतर्गत आकाशवाणीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचला जाणारा कार्यक्रम नियमित सादर करीत आहेत. याच मालिकेतला 100 वा कार्यक्रम सादर होताना तो क्षण ऐतिहासिक ठरला असून तो एक विश्वविक्रमी ठरला आहे.
या विशेष घटनेचे औचित्य साधून देशभर मोदीजींच्या या 100 व्या भाषणाचे सामुहिक श्रवण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याच अनुषंगाने गोखलेनगर मध्ये मान्यवर निमंत्रित आणि प्रतिष्ठीत नागरीकांच्या उपस्थितीत ‘वीर बाजीप्रभू विद्यालय’ परिसरात भाजपा पुणे शहराचे उपाध्यक्ष-श्री. योगेश बाचल, यांच्या पुढाकाराने मन की बात आज दि ३० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.