शरद पवारांनी केली निवृत्तीची घोषणा. नवीन अध्यक्षासाठी चौघांची नावे

शरद पवारांनी केली निवृत्तीची घोषणा. नवीन अध्यक्षासाठी चौघांची नावेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*_’शेवटी साहेब म्हणजेच पार्टी”; अजित पवार_*

मुंबई: राज्यात मागील अनेक दिवसापासून सत्तासंघर्षाची घडी नीट बसता बसेना, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज निवृत्तीची घोषणा केली. अचानक केलेल्या या घोषणेमुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापासून ते तालुक्याच्या कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच भाऊक झाले. पवारांनी निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती करण्यात येत आहे.

राज्यातल्या राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांना याप्रसंगी अश्रू अनावर झाले होते. दरम्यान नवीन अध्यक्षांच्या निवडीसाठी एक समिती गठित करण्याचं पवारांनी सांगितलं असून समिती सदस्यांची नावंही सुचवली आहेत. यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन या संभाव्य लोकांचा समावेश करण्याची सूचना शरद पवार यांनी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण? याबाबत राजकीय वर्तूळात चर्चा रंगू लागल्या आहेत. यामध्ये प्रामुख्यान चार नावं घेतली जात आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल या चौघांच्या नावाची चर्चा होत आहे.

*अजित पवार काय म्हणाले?*

अजित पवार म्हणाले, “तुम्ही एक गैरसमज करुन घेत आहात की पवार साहेब अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षामध्ये नाहीत असा भाग नाही. आज काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आहेत पण सोनिया गांधींकडं पाहून चालली आहे. त्यामुळं शरद पवारांच्या आजच्या वयाचा विचार करता साहेबांशी आणि सर्वांशी चर्चा करुन एका नवीन नेतृत्वाकडं आपण ही जबाबदारी देऊ पाहतो आहोत. ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टीचं काम करेल”

“शेवटी साहेब म्हणजेच पार्टी आहेत, हे कुणी येऱ्या गबाळ्यानं पण सांगायचं कारण नाही. आता पवार साहेबांनी निर्णय घेतला आहे. पवार साहेब लोकशाहीत जनतेचं ऐकत असतात हे मी कित्येक वर्षे पाहिलेलं आहे. चव्हाण प्रतिष्ठाण, सिल्व्हर ओकवरुन तुम्हाला साहेब आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतील. उद्या जो पार्टीचा अध्यक्ष होईल, तो पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles