‘भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर एकाच आईचे दोन जुळे अपत्य’; दलाई लामाच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

‘भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर एकाच आईचे दोन जुळे अपत्य’; दलाई लामाच्या वक्तव्याने चर्चेला उधाण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नवी दिल्ली: आज संपूर्ण जगभरात बौद्धपौर्णिमा साजरी होत आहे. बौद्धपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला जैन धर्मीय आंतरराष्ट्रीय आचार्य लोकेश यांच्यासह इतर धर्माचार्यांची दलाई लामा यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ‘भगवान गौतम बुद्ध आणि भगवान महावीर एकाच आईचे दोन जुळे अपत्य आहेत’ असे विधान बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी केले आहे.

पुढे बोलताना दलाई लामा म्हणाले, ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, बुद्ध, महावीर, नानक अशा अनेक महापुरुषांनी भारतभूमीवर जन्म घेऊन जगाला प्रेम आणि बंधुत्वाचा मार्ग दाखवला आहे. तसेच भगवान बुद्धांच्या करुणा आणि भगवान महावीर यांच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाने दाखवलेल्या मार्गानेच जगात शांतता आणि सद्भावना प्रस्थापित होऊ शकणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.

दलाई लामा यांची भेट घेतलेल्या इतर धार्मिक नेत्यांनी लामा यांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या देत जगात शांतता आणि सलोख्यासाठी बुद्ध आणि महावीरांच्या शिकवणुकीची नितांत गरज असल्याचं जैन आचार्य डॉ. लोकेश यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, जागतिक राजदूत आचार्य लोकेश जून महिन्यापासून अमेरिकेत शांतता सदिच्छा दौरा सुरु करणार असल्याची माहिती हिलालयीन कल्चरल सेंटरचे अध्यक्ष एल.पी. पोंटसांग यांनी दिली. या दौऱ्यादरम्यान आचार्य लोकेश जागतिक शांततेचा प्रचार आणि प्रसार करणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles