सत्ता संघर्षाचा निकाल उद्या; काहींची घालमेल तर काहींची धाकधूक

सत्ता संघर्षाचा निकाल उद्या; काहींची घालमेल तर काहींची धाकधूकपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_कोण जिंकणार, कोण हरणार आणि कोण तारणार?_

मुंबई: राज्यात मागील मकाही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या सत्ता संघर्षाचा उद्या शेवट होणार आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ महाराष्ट्र सत्ता संघर्षावर निर्णय देण्याची शक्यता आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मागच्या महिन्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने उद्धव आणि शिंदे गट आणि राज्यपाल कार्यालयाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता.

या माहितीनंतर महाराष्ट्रात सत्ता उपभोगणाऱ्या आमदारांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सत्ताधारी पक्षाच्या 16 आमदारांचे विधानसभा सदस्यत्व धोक्यात आले आहे.

*खंडपीठात सुनावणी करणाऱ्या पाच न्यायाधीशांची नावे*

मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने उद्धव आणि शिंदे गट आणि राज्यपाल कार्यालयाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला.
1- न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड (मुख्य न्यायाधीश)
2- न्यायमूर्ती एम.आर. शहा
3- न्यायमूर्ती कृष्णा मुरारी
4- न्यायमूर्ती हिमा कोहली
5- न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह
11 मे रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. कारण या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठातील एक न्यायाधीश 15 मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीपूर्वीच या खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

या प्रकरणातील वकिलांची नावे
सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील निरज किशन कौल, हरीश साळवे, महेश जेठमलानी आणि अधिवक्ता अभिकल्प प्रताप सिंह यांचा युक्तिवादही ऐकला. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या प्रकरणी राज्यपाल कार्यालयाची बाजू मांडली. तर ठाकरे गटाकडून कपिल सिबल यांनी बाजू मांडली.

या 16 आमदारांवर टांगती तलवार
1- एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री) – कोपरी-पाचपाखाडी (ठाणे)
2- अब्दुल सत्तार (कृषी मंत्री)- सिल्लोड (औरंगाबाद)
3- तानाजी सावंत (आरोग्यमंत्री)- परंडा (उस्मानाबाद)
4- यामिनी जाधव (आमदार)- भायखळा (मुंबई)
5- संदिपान भुमरे (आमदार)- पैठण (औरंगाबाद)
6- भरत गोगावले (आमदार)- महाड (रायगड)
7- संजय शिरसाट (आमदार)- औरंगाबाद पश्चिम
8- लता सोनवणे (आमदार)- चोपडा (जळगाव)
9- प्रकाश सुर्वे (आमदार)- मागाठाणे (मुंबई)
10- बालाजी किणीकर (आमदार)- अंबरनाथ (ठाणे)
11- बालाजी कल्याणकर (आमदार)- नांदेड उत्तर (नांदेड)
12- अनिल बाबर (आमदार)- खानापूर (सांगली)
13- महेश शिंदे (आमदार)- कोरेगाव (सातारा)
14- संजय रायमुलकर (आमदार)- मेहकर (बुलढाणा)
15- रमेश बोरनारे (आमदार)- विजापूर (औरंगाबाद)
16- चिमणराव पाटील (आमदार)- खानापूर (सांगली).

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles