“तुझ्या नजरेतच दडलीय माझी चंदेरी भेट….!”; वैशाली अंड्रस्कर

“तुझ्या नजरेतच दडलीय माझी चंदेरी भेट….!”; वैशाली अंड्रस्करपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_*शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण_

तुझ्या डोळ्यांच्या दर्पणी
प्रतिबिंब मम लाजले
केशकलापी गुंफलीस
चमचमती चांदणफुले

आहाहा…किती सुंदर कविकल्पना ना….! केशकलापी गुंफलीस चमचमती चांदणफुले….वृंदाताई ( चित्राताई ) करमरकरांच्या या ओळींनी मन अज्ञात आनंदाच्या सरींनी चिंब भिजले आणि ‘चंदेरी भेट’ या विषयाच्या अनुषंगाने त्यांच्या पुढील ओळींनी मनावर गारूड केले.

धुंद अशा या एकांती
सागर प्रीतीचा उसळूनी
तव चंदेरी भेट अगम्य
देह अवघा झाला चंदनी

धुंद एकांती…प्रीतीचा सागर… अगम्य चंदेरी भेट…अवघा चंदनी देह…या उपमा-अलंकारांनी नटलेल्या अलौकिक काव्याच्या रसग्रहणातून १९५९ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिकलेली बायको’ चित्रपटातील गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या स्वरातील, अभिनेत्री उषाकिरण यांच्यवर अभिनित पी. सावळाराम यांचे गीत आठवले..

प्रेमा काय देऊ तुला
भाग्य दिले तू मला…
प्रीतीच्या या पांखराचे
रत्नकांचनी पंख देऊ का
देऊ तुला का हर्षगंध हा
जीव फुलातून मोहरलेला….

प्रेमाला भेट द्यायची आहे… आणि तीही अफलातून द्यायची आहे….प्रीतीच्या पाखराचे पंख…जीवफुलातून मोहरलेला हर्षगंध…होय प्रेम दोन जीवांचे…जे नजरेतून फुलते, शब्दांवर झुलते आणि काहीतरी मनातलं द्यायला आतूर होते. ते देणं म्हणजे नुसतं हस्तांतरण नसतं..ती असते एक भेट..पण ती नसते भौतिकातल्या जगातली, ती नसते हिऱ्यामोत्यांची …ती भेट असते चंदेरी…तिला असतो चांदणफुलांचा गंध, नजरेचा स्पर्श आणि भावनांचा अर्थ…!

अशा या रम्य भावनांची शब्दगुंफण करण्याचे कारण म्हणजे आजचा मराठीचे शिलेदार समूहातील ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेचा विषय ‘चंदेरी भेट’. समूहातील बऱ्याच शिलेदारांनी हा विषय चांदण्या रात्रीची भेट या आशयाने पण गुंफला. त्याही रचना मनास भावल्या. काही प्रणयरम्य तर काही जबाबदारीच्या ओझ्याखाली कातर झालेल्या… कुणाची चंदेरी भेट मैत्रीच्या वाटेवर क्षणभर आनंद देऊन जाणारी….खरेतर प्रत्येकाची अनुभूती वेगळी त्यामुळे रचनांमध्ये वैविध्य असणारच…तरी पण हव्या तितक्या रचना समूहात बघायला मिळाल्या नाहीत. ज्यांनी लिहिले ते खरोखरच मनापासून व्यक्त झालेत. सर्वांचे खूप खूप अभिनंदन…. आपल्या तरल लेखणीस मानाचा मुजरा… आणि भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा….!

*✍️सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर*
*कवयित्री/लेखिका*
*©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
*©मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles