
तुरपाई
किती होती भारदस्त, भिमाच्या लेखणीची शाई..//
भिन्न जाती धर्मांची केली एकसंघ तुरपाई..//
गोचिडापरी रुळल्या होत्या, परंपरेच्या रूढी
टाके काढून रूढींचे, केली ज्ञानाने तुरपाई
अज्ञानाच्या खाईत मानवी हक्कांची पायमल्ली
शिक्षण हक्काच्या कायद्याने ज्ञानाची तुरपाई..//
उच्च निचतेची येथे विषमता रूळली होती
बहुजनांच्या उत्कर्षा दिली आरक्षणाची ग्वाही..//
प्रत्येकांच्या अस्तित्वांची न्यायिक चौकट राखली
समता स्वातंत्र्य बंधुताची केली सरबराई..//
भिन्न संस्थानांमुळे देशाच्या एकसंघास भिती
संविधानात केली अखंड भारताची बुनाई..//
हंसराज खोब्रागडे
अर्जुनी/मोर, जि. गोंदिया