थोडासा वेळ

थोडासा वेळ



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

दिसतंय विचित्रच
बघतांना आजूबाजू
फोन बघूनच जो तो
लागे बघा कुजूबुजू

लोकं बरेच शेजारी
आपसात नाही चर्चा
फोन मध्येच गुंतून
मोडत असतात खुर्च्या

किव येतंय बघून
बोलू तरी काय यांना
‘फोन ठेवून बाजूला
बघा एकदा सर्वाँना’!

आपल्याच माणसांची
जोवरी आहे सोबत
वक्र दृष्टी टाकण्याची
येणार नाही नौबत

दूर जाईल निघून
तेव्हा कळेल किंमत
उपयोग ना राहिल
बांधून आता हिंमत

फोन त्यांचा हिसकून
जरा करावी गंमत
अवतार त्यांचा बघून
झाली नाही हिंमत

वाटलं…
मी जर असतो फोन
तर काय झालं असतं
मनांमध्ये आला विचार
फार छान झालं असतं

देवपूजा करण्या आधी
आबांनी बघितले असते मला
सकाळ च्या रामप्रहरी
नेले असतें फिरायला

दिवसभर ताई सुध्दा
घेऊन असती मला
दूर करणे अवघड
झाले असते दादांला

मजा किती आली असती
ताई, दादांसोबत खेळतांना
सार्थक झाले आयुष्याचे
वाटले असते मरतांना

जिथे तिथे बाबांसोबत
गेले असते फिरायला
आली असती मजा मला
सारे जग बघायला

सतत लावून गालाला
आई हसत बसली असती
मला बघत असतांना
मीही खूष झाली असती

आई…, बाबा…,

नको मला मोठा केक
नको मला नवीन खेळ
गिफ्ट म्हणून द्याल का?
मला तुमचा थोडासा वेळ
मला तुमचा थोडासा वेळ

प्रा दिनकर झाडे , गडचांदूर
जि. चंद्रपूर

Previous article
Next article

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles