
मज्जा सुट्टीतली
सुट्टी लागली शाळेला
आजोळी जाऊया चला
दोस्तासंगे शेताशिवारात
मनसोक्त भटकुया जरा…
नदीच्या गार गार पाण्यात
डुबक्या मारुन पोहुया
एकमेकांना भिजवुन भिजुन
मज्जाज मज्जा करुया
लगोरी, लपंडाव ,पकडापकडी
हुतूतू खुप खेळ खेळुया
आंबे ,जांभुळ, करवंद खाऊनी
गावच्या किल्ल्यावर चढुया
सारं विसरुन जाऊ
अन् भरभरुन जगुन घेऊया
सुट्टी संपूच नये लवकर
बाप्पाकडे हे एकच मागणे मागुया
सौ.उर्मी( हेमश्री) घरत,पालघर