
आई
आई माझं घर
दिला तूच सारा
नको आता मला
विश्व रुप तारा….
खरी आहे गाथा
नऊ मास गोळा
दूध दिले प्याला
जीव वाढे तोळा…
पैसा धन नको
जग मज वाहू
साता जन्म तुझा
डोळे तुझे पाहू…
कुश तुझी छान
तुझ्या आलो पोटी
जन्म योग संग
मिळे धन कोटी….
जीर्ण ऊन तुझे
झेली देह धारा
सुख पिऊ दारी
सोने हिरा पारा…
शिवाजी नामपल्ले, लातूर
=======