
महाराष्ट्र माझा
भारत माझा आहे सर्व संपन्न देश
महाराष्ट्रातील लोकांचा विभन्न वेश….
महाराष्ट्र राज्य माझे राज्यात महान
सदैव गाऊ आपण याचे गुणगान….
पावनभूमी आहे ही संतमाऊलींची
रेलचेल आहे इथे सण अन उत्सवांची..
आनंदी जोशी पहिली डाॅक्टर महिला
मुलींना शिक्षणद्वार खुले केले वंदन सावित्रीला….
सांस्कृतिक वारसा महाराष्र्टाला लाभलाय
अजूनही मानवी संस्कृतीने तो जपलाय…
छत्रपती शिवजी महाराज इथे जन्मले
हिंदवी स्वराज्य शिवबाने स्थापन केले..
म.गांधी,लो.टिळक,आगरकर याच मातीतले
स्वातंत्र्यासाठी यांनी अतोनात हाल सोसले…
कल्पना,कृष्णा भिडल्या उंच गगनी
स्वतःचे नाव कोरले सर्वांच्याच मनी….
भीमा,कृष्णा,गोदावरी नद्या आहेत पावन
सृष्टीचे सौंदर्य खुलवतो ॠतू सावन…
महाराष्ट्राची राजधानी मुंबई नगरी
निसर्गाचे देखणं कोंदण आहे सह्यगिरी…
महाराष्ट्रात सर्वांचीच आहे परंपरेत एकजूट
नाही होणार मानवीपरंपरेची कधीच ताटातूट….
वसुधा नाईक,पुणे
========