अवकाळी पाऊस..

अवकाळी पाऊस



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

उठलं की रानात
लक्ष त्याचं कामात
बी पासून फळा पर्यंत
येईल का ताटात…

पाहिलं की हिरवं शिवार
भरून उरतो तो अपरंपार
वास्तव स्वप्न पाहण्यात व्यस्त
मळाच उरतो त्याचा आधार..

मन की बात सांगे सखीला
तिला ही ऐका दागिन्यांची आशा
मन लावून काम करते ती….
देवाकडे प्रार्थना नको निराशा

फिरून बांधावर म्हणे तो
कर्जाची चिंता कशाला….
यंदाचे पिकावर भरोसा
येईल पैका लेकरांच्या शिक्षणाला

बाजल्यावरचं पिकलं पान
लेकराच्या कष्टाला यश आण
पाही ओ आभाळाकडे ध्यान
देवाचा कौल पल्लवित मन

चारचौघात बसेन मी ही
टाळ्यांच्या गप्पात रमेन मी ही
अभिमानाची कॉलर ताठ…
बागायतदार मिरवेन मी ही..

निसर्गच तो अवकाळी पाऊस
घाली क्षणात हुडधूस…
होत्याचं नव्हतं करून जाई
पुन्हा येईन सांगे अश्रूस…

दोष देत नशिबाला…
खचून तो अंथरूण धरतो
स्वप्नं त्याची मातीत….
गरीब शेतकरी राहतो

सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे
=========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles