‘बटवा’ म्हणजेच पुरुषांची ‘मिनी बँक’; वृंदा करमरकर

‘बटवा’ म्हणजेच पुरुषांची ‘मिनी बँक’; वृंदा करमरकरपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*सोमवारीय त्रिवेणी काव्यस्पर्धेचे परीक्षण_*

‘बटवा तुझा सख्या भरून राहू दे
माझी हौस सदा मला नित्य पुरवू दे’
सध्या काटकसर केली पाहिजे’..!!6ॉ

वास्तविक ‘बटवा’ हा स्त्री-पुरुषांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. बटवा फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. ज्या वेळी वस्त्रकला विकसित झाली, त्या कालखंडाचा विचार केला तर, प्राचीन विणकामाच्या संबंधीचा सर्वात पुरातन उपलब्ध पुरावा मध्य ईजिप्तमधील “अल् बदारी” येथे उत्खननात एका स्त्रीच्या थडग्यात आढळला. या थडग्यात एक मातीचे वाडग्यासारखे भांडे मिळाले. त्यावर रूळ (बीम) लावलेल्या आडव्या मागावर विणकाम होत असल्याचे चित्र आहे. भारतातील “अजिंठा” लेण्यातील चित्रांवरून त्या काळी कशिद्याचे कापड विणले जात होते व तो काळ इ. स. पू. दुसरे ते इ. स. पहिले शतक यांमधील असावा. त्या काळी अति तलम कापड विणले जात होते व परदेशी प्रवासी अशा कापडाला ‘विणलेली हवा’ (आबावाव) किंवा शबनम म्हणत व तसे कापड तेवढ्या वजनाचे सोने देऊन खरेदी करीत.

चीनमध्ये इ. स. पू. बाराव्या शतकात शांग (यिन) राजघराण्याच्या काळात ब्राँझच्या मूर्ती कशिद्याच्या कापडांत गुंडाळून ठेवलेल्या आढळल्या. हे कापड विशेष प्रकारच्या मागावरच तयार झाले असले पाहिजे. इ. स. पू. ३०० च्या सुमारास चंद्रगुप्त मौर्यांच्या दरबारात ग्रीक राजदूत मीगॅस्थिनीझ यांनी जरीकाम केलेले कपडे व नक्षीकाम केलेली तलम मलमल पाहिल्याचे नमूद केले आहे.

‘महिन्याच्या एक तारखेला माझा बटवा नोटांनी भरलेला
आज सतत असते बायको माझ्या दिमतीला, चतसध्या महागाईचा आलेख चढता आहे….’

अशा या बटव्याचे विणकाम ही प्राचीन परंपरा असलेली कला आहे. ज्यावेळी कपडे शिवले गेले, तेंव्हा ‘बटवा’प्रकार सुध्दा विकसित झाला. ग्रामीण भागातील पुरुषांकडे आणि क्वचित बायकांकडे पानाची चंची असायची. अजूनही असेल. त्या चंचीत पैसे सुध्दा ठेवले जायचे. आता पुरुषांच्या बटव्यांना ‘पाकिट’ किंवा ‘वाँलेट’ शब्द रुढ झाला आहे. स्त्रियांच्या बटव्यांचे तर नानाविध प्रकार, आकार आहेत. मखमली कापड, सँटिन, काँटन कापडांचे आकर्षक रंगांचे बटवे लक्ष वेधून घेतात. टिकल्या, मणी, मोती, आरसे यांनी सजवलेल्या बटव्यांनी लक्ष वेधून घेतले नाही तरच नवलच!

‘बटवा माझा माणिकमोत्यांनी सजवला
माझ्या कमरेला किती छान शोभला,
मला मँचिंग साडी घ्यायला हवी आहे..!!

आजकाल विवाह प्रसंगी वधूच्या हाती डेकोरेटिव्ह ड्रेसला मँचिंग बटवा असतोच. अगदी खास पार्टीच्या प्रसंगी, स्त्रिया ड्रेसला किंवा डिझायनर साडीला मँचिंग बटवा हातात मिरवतात. आता गंमत अशी आहे बायकांचे बटवे,थैल्या, पर्सेस सहसा कपाटात सुरक्षित असतात, ज्यात पैसे असतात. पण पतीदेवांचे बटवे,किंवा वाँलेट तसे पत्नीला सुध्दा माहित असतात. ज्याचा बटवा भरलेला त्याचे जिणे सुखाचे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. हा बटवा अगदी जिवापाड जपला जातो. पतीदेवाचा बटवा बघून पत्नी तर लय खूश होते. मुख्य म्हणजे बँका अस्तित्वात नव्हत्या तेव्हा लोकं मंदिरातल्या पेटीत किंवा पूजा-याकडे सोने, नाणे वगैरे ठेवायचे. पण त्यातही अविश्वासी बदल झाला. म्हणून बँक अस्तित्वात आली. ‘पुरूषांचा बटवा’ हा सुद्धा एक प्रकारची तात्पुरती का होईना एक दिवसाची ‘मिनी बँक’च आहे.

‘त्याचा पैशांनी भरलेला बटवा
तिने पाहताच भलतीच सुखावली
तिची खरेदीची यादी बरीच लांबली’

आजच्या ‘सोमवारीय त्रिवेणी काव्यस्पर्धेसाठी आपल्या आदरणीय राहुल सरांनी दिलेला “बटवा” विषय एकदम वेगळा. पण नेहमी प्रमाणे विचार करायला लावणारा आहे. अनेक शिलेदारांनी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. अनेकांनी छान त्रिवेणी रचना लिहिल्यात. पण यात ‘आजीबाईचा बटवा’ या विषयाशी निगडित अनेक रचना दिसल्या. त्याऐवजी ‘पैशाचा बटवा’ अशा अर्थाने रचना अपेक्षित होत्या. असो सर्वांना असेच त्रिवेणी लेखना साठी भरभरून शुभेच्छा..!!

आदरणीय राहुल सरांनी मला त्रिवेणी स्पर्धेच्या परीक्षण लिखाणाची संधी दिल्याबद्दल मी त्यांची शतशः ऋणी आहे.

सौ. वृंदा (चित्रा) करमरकर.
सांगली, जिल्हाः सांगली.
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक, सहप्रशासक.
©मराठीचे शिलेदार समूह.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles