
रोपवाटिका.. सिझनल… Detroit.. State Michigon.
वसुधा नाईक थेट युएसएहून
यू एस ए: आज दि.२४/०५/२०२३, बुधवार रोजी या ठिकाणी नवीन रोपे आणायला गेलो. पोयटा माती पण आणली. येथील मातीमध्ये भुसा, थर्माकॉलचे कण असतात. खत असते. कुंड्या खूप देखण्या असतात.देखणी फुले, विविध रंग खूप छान वाटते.
आज मी जिथे गेले तिथे खूप विविध आकाराची पाने, विविध रंगांची पाने पहिली. जणूकाही ही पाने, फुले सर्व कृत्रिम वाटत होते.
ते पाहताना मन आनंदी होत होते. प्रसन्न होत होते.
इथे ही फुलझाडे फक्त चार महिने टिकतात. कारण खूप थंडी असते. आत्ता फक्त मे ते सप्टेंबर हा काळ फुलांच्या वाढीसाठी उत्तम असतो. येथील पॅटीओ, घरापुढील, मागील जागा,येथे मस्त रोपे लावली जातात या सिझनमध्ये..
वसुधा हरवते फुलापानात
वसुधा रमते या निसर्गात
अशी विविध रंगी फुले पाहून
मन जाय वसुधाचे हरखून….