उद्या मोदींच्या हस्ते नवीन संसद भवनाचा श्रीगणेशा; जुन्या संसद भवनाचे काय”

उद्या मोदींच्या हस्ते नवीन संसद भवनाचा श्रीगणेशा; जुन्या संसद भवनाचे काय”



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नवी दिल्ली: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. या नव्या इमाकतीच्या उद्घाटनच्या धामधुमीत सध्या प्रत्येक भारतीयाच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की, आता संसद भवनाच्या जुन्या इमारतीचे (old Parliament House) काय होणार? तीच इमारत जिथून नवीन राष्ट्रांची बांधणी करण्यात आली. इतिहास निर्माण झाला. अनेक कायदे झाले. ही ऐतिहासिक वास्तू पाडणार का? जाणून घ्या त्या जुन्या इमारतीचे नेमकं काय होणार?

*संसद भवनाच्या जुन्या इमारतीचं काय होणार?*

जुने संसद भवन पाडले जाणार नाही. त्याला संरक्षण दिले जाईल. सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे की, सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पामध्ये सूचीबद्ध केलेली कोणतीही हेरिटेज स्थळे पाडली जाणार नाहीत. या प्रकल्पात इंडिया गेट, संसद, उत्तर आणि दक्षिण ब्लॉक, राष्ट्रीय अभिलेखागार यांचा समावेश आहे. या प्रकल्पात विद्यमान संसद भवनाच्या नूतनीकरणाचाही समावेश आहे. जुन्या संसद भवनाचा उपयोग भविष्यात संसदीय कार्यक्रमांसाठी केला जाईल.

*जुनी इमारत पर्यायीपणे वापरली जाणार*

मार्च 2021 मध्ये केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेत सांगितले होते की, नवीन संसदेची इमारत तयार झाल्यावर जुन्या इमारतीची दुरुस्ती करून पर्यायी वापर करावा लागेल. सरकारच्या म्हणण्यानुसार जुने संसद भवन पाडले जाणार नाही. देशाची पुरातत्व संपत्ती असल्याने त्याचे जतन केले जाईल. संसदेशी संबंधित कार्यक्रम आयोजित करण्यासाठी या इमारतीचा वापर केला जाणार आहे.

*विद्यमान संसद भवनाचे संग्रहालयात रूपांतर केले जाईल*

2022 च्या अहवालावरनुसार जुन्या संसद भवनाचे संग्रहालयात रूपांतर केले जाऊ शकते. संसद भवनाचे संग्रहालयात रूपांतर झाल्यानंतर लोकसभेच्या चेंबरमध्येही अभ्यागत बसू शकतात. 2006 मध्ये, या इमारतीत संसद संग्रहालय देखील बांधले गेले होते, जिथे देशातील 2500 वर्षांचा समृद्ध लोकशाही वारसा प्रदर्शित करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले होते की, नवीन संसद भवनासाठी अंदाजे 862 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पण नवीन संसद भवनाची काय गरज होती, जुनी संसद भवन कौन्सिल हाऊस म्हणून वापरण्यात आली आणि नंतर तिचे संसद भवनात रूपांतर करण्यात आले. पूर्ण संसद म्हणून त्याची रचना कधीच झाली नव्हती.

स्वतंत्र भारताच्या पहिल्या संसदेपासूनच देशाचे संविधान अस्तित्वात आले . संसद भवनाच्या समृद्ध वारशाचे जतन करणे ही राष्ट्रीय महत्त्वाची बाब असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मुळात जुन्या संसद भवनाला कौन्सिल हाऊस म्हणत. या इमारतीत इम्पीरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल आहे आणि ती भारताच्या लोकशाहीचा आत्मा मानली जाते. जुन्या संसद भवनाची रचना ब्रिटिश आर्किटेक्ट सर एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी केली होती. ही इमारत पूर्ण होण्यासाठी सहा वर्षे लागली. ही इमारत 1927 मध्ये पूर्ण झाली. 1956 मध्ये, विद्यमान संसद भवन इमारतीत आणखी दोन मजले जोडण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles