धक्कादायक..! इंडोनेशीयातील हिंदू मंदिरात जर्मन महिलेचा विवस्त्र घुसण्याचा प्रयत्न

धक्कादायक..! इंडोनेशीयातील हिंदू मंदिरात जर्मन महिलेचा विवस्त्र घुसण्याचा प्रयत्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

बाली: इंडोनेशियाची राजधानी बालीमधून धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. बालीमध्ये फिरायला आलेल्या एका जर्मन पर्यटक महिलेने विवस्त्र अवस्थेत इथे असणाऱ्या एका हिंदू मंदिरात प्रवेश केला. यामुळे तिला अटक करण्यात आली आहे. या महिलेचे नाव दारजा तुशिंस्की असे असून तिचे वय २८ वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे.

यूकेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, याठिकाणी आयोजित एका कार्यक्रमाचे तिकीट नाकारल्याने दारजा तुशिंस्की चांगलीच संतापली. या संतापातून तिने हे विचित्र पाऊल उचलले असल्याचे सांगितले. तिने आधी तिथल्या सुरक्षारक्षकांशी धक्काबुक्की केली. त्यानंतर निषेध म्हणून तिने सर्व कपडे उतरवून मंदिरात प्रवेश केला.

मंदिराचे दार उघडल्यावर तिला सुरुवातीला विरोध झाला. परंतु ती नग्नावस्थेत मंदिरात शिरली. तसेच तिथल्या नृत्यांगणांची नक्कल करू लागली. त्यानंतर तिथल्या सुरक्षा रक्षकांनी दारजा हिला ताब्यात घेतलं आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस आल्यावर सुरक्षा रक्षकांनी या महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले. हे प्रकरण आता न्यायालयात असून ती दोषी आढळली तर तिला दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल.

या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या महिलेने उबुद येथील सरस्वती मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या २८ वर्षीय महिलेने मंदिराच्या गाभाऱ्यातही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. इंडोनेशियन पोलिसांनी सांगितलं की, आम्ही चौकशी केल्यावर समजले दारजा ज्या रिसॉर्टमध्ये राहात होती तिथेही ती सर्वत्र नग्नावस्थेत फिरायची.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles