शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चारोळ्या

*ग्रामदेवता*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जुण्या संस्कृती, रूढी, परंपरा
ग्रामदेवता नित्य जतन करी
किर्तन, प्रवचन संताचे ऐकवून
भावी पिढी घडवी संस्कारी

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🚩✍️♾️♾️♾️♾️
*ग्रामदेवता*

ग्रामदेवता गावोगावी
मंदिरे नवी उभारली
ज्ञांमंदिराची अवस्था
जशीच्या तशी राहिली

*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🚩✍️♾️♾️♾️♾️
*ग्रामदेवता*

रक्षणकर्ती गावाची सर्व
ग्रामदेवतेला पूजतात
यात्रात्सोवाला देवीच्या
सारे गावकरी जमतात

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🚩✍️♾️♾️♾️♾️
*ग्रामदेवता*

गावरक्षण ग्रामदेवता करी
रोगराई ईडा पीडा दूर करी.
नैसर्गिक संकटे दूर सारून
गावास ग्रामदेवता तारी.

*प्राजक्ता आर. खांडेकर, नागपूर*
*सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🚩✍️♾️♾️♾️♾️
*ग्रामदेवता*

गावची राखणदार
ग्रामदेवता असते
अनिष्ट दुर सारून
नवसाला पावते

*सौ. सुनिता लकीर आंबेकर*
दादरा आणि नगर हवेली
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️✍️🚩✍️♾️♾️♾️♾️
*चारोळी- ग्रामदेवता*

निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं
माझं छोटंसं एक गावं
पारावरच्या ग्रामदेवते प्रति
गावकऱ्याच्या मनात, श्रद्धा भाव

*सौ.इंदु मुडे, ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️✍️🚩✍️♾️♾️♾️♾️
*ग्रामदेवता*

*ग्राम रक्षक,गावाचा आधार,*
*ग्रामदेवता गावा-गावात असायची..,*
*पूर्वीच्या काळची,आस्तिक पिढी,*
*जत्रेत कुळाचार, पाळताना दिसायची…!*

*कवी श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*© सदस्य, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️✍️🚩✍️♾️♾️♾️♾️
*ग्रामदेवता*

ग्रामदेवता पूजापाठ निरंतर
प्रसन्न असेल सदैव घरदार
आशिर्वाद ग्रामदेवतेचे जरूर
वर्तमान भविष्य असे सुंदर

*श्री अशोक महादेव मोहिते*
बार्शी जिल्हा सोलापुर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🚩✍️♾️♾️♾️♾️
*ग्रामदेवता*

ग्रामदेवतेचे करुनं पुजन
आशिष लाभो आमुच्या ग्रामासी
दे बरकत आरोग्य नि धनधान्याची
ठेवितो माथा तुझेच चरणासी

*सौ. उषा सत्येंद्र वराडे ,पुणे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️✍️🚩✍️♾️♾️♾️♾️
*ग्रामदेवता*

ग्रामगितेतून घेऊन बोध
गाव खेड्यांना येतो गत वैभव
सुख समृध्दी नांदू लागतो
ग्रामदेवता ही आमचे अभिनव

*केवलचंद शहारे*
सौंदड गोंदिया
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles